JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनाला मात देणाऱ्या गिर्यारोहकाची कहाणी, आता नवी हिमशिखरे घालतायेत साद

कोरोनाला मात देणाऱ्या गिर्यारोहकाची कहाणी, आता नवी हिमशिखरे घालतायेत साद

सतीश नामदेव यांनी 2018 मध्ये -20 डिग्री तापमानात केदारनाथचा पर्वत सर केला होता. तेथे बर्फाचं वादळ त्याला रोखू शकलं नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 21 मे : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळचा एक युवा गिर्यारोहक आता पुन्हा उंच पर्वतांवर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे. खरंतर कोरोनाने त्याच्या मजबूत ध्येयशक्तीला ऱोखण्याचा प्रयत्न केला. कोरोनाने संक्रमित झाल्यानंतर तो काही दिवस रुग्णालयात राहिला, आणि त्यावर मात करुन तो घरी परतला. त्याच्या मनात विश्वास होता की, बर्फाची वादळे रस्ता अडवू शकले नाही तर कोरोना आपले काय बिघडवेल. सतीश नामदेव (Satish Namdev) एक कुशल गिर्यारोहक आहे. त्याची ही कहाणी आहे. सरकारी रुग्णालयात काम करत सताना त्याला कोरोनाची लागण झाली. कोरोना झाल्याची माहिती मिळाल्यावर सतीश चिंतेत पडले. त्यांच्या घरात ते कमवणारे एकटेच, त्यामुळे आपल्याला काही झाले तर घरच्यांचे काय, असा प्रश्न त्यांना सतावत होता, घरातल्यांकडे कोम लक्ष देईल, ही चिंता त्यांना सतावत होती. हे सगळे अनुत्तरीत प्रश्न मनात घेऊन ते रुग्णालयात दाखल झाले आणि वैद्यकीय टीमची वाट पाहत राहिले. हे सर्व घडले २९ एप्रिलला. वैद्यकीय टीम आली आणि त्यांनी भोपलच्या एका खासगी रुग्णालयात सोपान यांना दाखल करण्यात आले. सतीश चिंतेत होते पण निराश झाले नव्हते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी सकारात्मक विचार राखला. आपल्यासोबत असलेल्या मोबाईलमध्ये पर्वतारोहणाचे जुने व्हिडिओ ते पाहत बसत. त्यावेळी मनाने हा ठाम निर्धार केला की, बर्फाळ प्रदेशातील वादळांनी आपण डगमगलो नाही, तिथेही आपण पुढेच जात राहिलो, तर इथे हा कोरोना आपल्याला कसा हरवू शकेल. उपचारासोबतच या सकारात्मक विचारांनीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणली. त्यानंतर पूर्णपणे बरे झाल्यावर ते घरी परतले. कोविड केंद्रामधील चहा कोविड केंद्रात असेलल्या उपचाराच्या काळात सतीश आपल्या सहकारी रुग्णांसाठी चहा करीत असत. त्यांनी आपल्याबरोबरच्या रुग्णांनाही कोरोनासोबत लढण्याची जिद्द दिली. आता बरे झाल्यानंतर उंचातल्या उंच पर्वतरांगावर चढाई करुन, भीतीच्या पुढे विजय आहे हा संदेश द्यावा असं त्यांचं स्वप्न आहे. सतीश नामदेव यांनी पहिले गिर्यारोहोण 2018 सालात केले होते. तेव्हा त्यांनी केदारनाथच्या ऊंचे पर्वतांना पार केलं होतं, ज्यांची उंची 12,500 फूट एवढी होती. तिथे तापमान उणे 20 अंश सेल्सिअस इतकेच असे. दुसऱ्यांदा साल २०१९ साली हिमाचल प्रदेशात त्यांनी गिर्यारोहण केले. तिथे त्यांनी 14,600 फूट उंचीवर उणे 15 अँश सेल्सिअस तापमानात बर्फाच्या पर्वतरागांवर चढाई करुन विजय मिळविला होता. भीती कशाची ? युवा गिर्यारोहक सतीश नामदेव यांच्या जिद्दीला आता पंख फुटले आहेत. भविष्यात गिर्यारोहणातील नवा रेकॉर्ड आपल्या नावावर असावा, यासाठी ते प्र्यत्न करतायेत. सतीश यांच्या विजयाचा एकच मंत्र आहे. सतत आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा, रस्त्यात वादळे येतील, पण थांबू नका, घाबरु नका, सतत पुढे चालत राहा.. ध्येय नक्कीच तुमच्या आवाक्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या