JOIN US
मराठी बातम्या / देश / उत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर

उत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर

‘मतदानाच्या दोन टप्प्यात मतदानाला फारसा उत्साह दिसला नाही. मतदारांमध्ये उत्साह नसणं हे भाजपची चिंता वाढविणारं आहे.’

जाहिरात

Gadwal: Congress President Rahul Gandhi at a public gathering at Gadwal, in Jogulamba Gadwal district, Monday, Dec.03, 2018. (Handout Photo via PTI)(PTI12_3_2018_000147B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 18 एप्रिल : लोकसभेच्या मतदानाचे दोन टप्पे गुरुवारी पूर्ण झाले. सगळ्या देशाचं लक्ष लागलंय ते उत्तर प्रदेशाकडे. कारण राज्यात लोकसभेच्या सगळ्यात जास्त 80 जागा आहेत. सपा आणि बसपाने आघाडी केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. तर आघाडी आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढ होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात सपा आणि बसपावरही हल्लाबोल केला. आपला जनाधार वाढवायचा आहे त्यामुळेच  काँग्रेसला सपा आणि बसपाला अंगावर घ्यावं लागलं असं मत न्यूज18 उत्तर प्रदेशच्या ‘महा बहस’ या कार्यक्रमात बोलताना तज्ज्ञांनी व्यक्त केलं. उत्तर प्रदेशातल्या बदायू इथं झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशच्या अधोगतीला सपा,बसपा आणि भाजप कारणीभूत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आत्तापर्यंत झालेल्या सभांमध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राहुल गांधी यांचं मुख्य टार्गेट होतं.

मात्र राहुल गांधी यांनी आपली रणनीती बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात सपा-बसपा आणि काँग्रेस एकत्र येत भाजपला टक्कर देतील असं बोललं जात होतं मात्र बसपाने काँग्रेसला आघाडीत घेण्यास विरोध केला. त्यामुळे या पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असं बोललं जात होतं. मात्र आला प्रचारात आणखी रंगत येणार आहे. राज्यात काँग्रेसचा जनाधार वाढायचा असेल तर काँग्रेसला आक्रमक होण्याशीवाय पर्याय नाही हे त्यांना समजलं आहे त्यामुळेच त्यांनी आपली भूमिका बदलली असं मत अमिताभ अग्निहोत्री यांनी व्यक्त केलं. काँग्रेसची सध्याची अवस्था अतिशय दयनिय आहे. संघटनात्मक बदलाची गरज आहे त्यामुळे काँग्रेसला जास्त परिश्रम घ्यावे लागणार असल्याचं मतही या चर्चेत व्यक्त झालं. मतदानाच्या दोन टप्प्यात मतदानाला फारसा उत्साह दिसला नाही. मतदारांमध्ये उत्साह नसणं हे भाजपची चिंता वाढविणारं आहे असं मत रमणमणी लाल यांनी व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या