नवी दिल्ली, 01 मे : देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वच सेवा ठप्प आहेत. यातच अनेक राज्यांमध्ये परराज्यांमधील कामगार अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी सुरुवातील केंद्राने राज्यांना बसची सोय करा असे आदेश दिले होते. मात्र आता केंद्राने विशेष रेल्वे सुरुव करण्यास परवानगी दिली आहे. लवकरच रेल्वे सुरु करण्याची व्यवस्था करण्यात य़ेईल अशी माहिती देण्यात आली आहे. अडकलेले प्रवासी, कामकार, विद्यार्थी यांना घरी पोहोचवण्यासाठी रेल्वेची मदत घेतली जाणार आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश दिले आहेत. स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून ही वाहतूक होणार असल्याचंही गृह मंत्रालयाने सांगितलं. राज्यांशी समन्वय राखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नोडल अधिकारी तौनात करण्यात येतील. रेल्वे कधी सुरु करायच्या तसंच त्यांच्या वेळेबाबतचा निर्णय राज्य आणि रेल्वे ठरवणार आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर गर्दी होणार नाही यासाठी आणि तिकिट विक्रीबाबत रेल्वे मंत्रालय सोशल डिस्टन्सिंगच्या गाइडलाइन्स प्रसिद्ध कऱणार आहे.
तेलंगणानंतर आता केरळमधून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. केरळचे मंत्री व्ही एस सुनिल कुमार यांनी सांगितलं की, सेहपली विशेष ट्रेन 1200 प्रवाशांना घेऊन एर्नाकुलम इथून ओडिसाला शुक्रवारी रवाना होईल. याआधी तेलंगणातून विशेष रेल्वे झारखंडला गेली आहे. यातून 12 प्रवाशी पाठवण्यात आले. हे वाचा : RED ZONEची नवी यादी; यानुसारच निर्बंध करणार शिथिल, तुमचा जिल्हा कुठल्या झोनमध्ये संपादन - सूरज यादव