JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊन 4.0 : केवळ 3 प्रवाशांना घेऊन विमानानं केलं टेकऑफ

लॉकडाऊन 4.0 : केवळ 3 प्रवाशांना घेऊन विमानानं केलं टेकऑफ

देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऋषिकेश, 25 मे : जॉलीग्रांट एअरपोर्टमध्ये आजपासून डोमेस्टिक फ्लाइट सुरू झाली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 5 फ्लाइट्स ये-जा करू शकणार आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अद्याप प्रवासी हवाई सेवा करीत नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीहून सकाळी 7.30 वाजेपर्यंत पोहोचलेली पहिल्या फ्लाइट्समध्ये केवळ तीन प्रवासी जॉलीग्रांटला पोहोचले. तर तीन प्रवाशांना घेऊन ही फ्लाइट परतली. या प्रकारे पंतनगरहून जॉलीग्रांटला पोहोचलेल्या फ्लाइटमध्ये केवळ 8 प्रवासी होते.  मुंबईहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबईहून आज जॉलीग्रांट येणारी फ्लाइट रद्द झाली आहे. डेहराडून प्रशासनने जॉलीग्रांट एअरपोर्टहून येणाऱ्या सर्व लोकांना क्वारंटाईन करण्याची सोय करण्यात आली आहे. विमानातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 7 दिवसांसाठी इंन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तब्बल 350 हॉटेलातील 6000 खोल्यांची सोय केली आहे. या खोल्यांचा खर्च क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला करावा लागणार आहे. क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या हॉटेलांमध्ये 3 विभाग करण्यात आला आहे. यामध्ये 750 रु, 1000 रु आणि 1500 रुपये अशा स्वरुपात प्रतिदिवसासाठी आकारले जाणार आहे. सोबतच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या व्यक्तीला 150 रुपये (जेवणाचा खर्च) द्यावे लागणार आहे. इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईननंतर त्यांना पुढील 7 दिवस होम क्वारंटाईन करावा लागणार आहे. हे वाचा - भारताने करुन दाखवलं! सर्वाधिक पीपीई किट बनवणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पीपीई किटमुळे कोरोना योद्ध्यांची तब्येत ढासळली, श्वास घेण्यास होत होता त्रास

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या