कानपूर, 11 जून : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एक पती पत्नीमध्ये चांगलाच ड्रामा (Drama) झाल्याचं पाहायला मिळालं. पत्नीनं पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत (Long Life of Husband) ठेवलं. पण त्यानंतर एकच गोंधळ झाला. पत्नीनं पुजेनंतर पतीबरोबर सेल्फी घेतला. पण पतीच्या फोनमधला सेल्फी (Selfie from Phone) पाहताना तिला असं काही दिसलं की, तिचा पारा आकाशाला टेकला आणि त्यानंतर प्रचंड वाद झाले. पण पत्नीनं नेमकं असं काय पाहिलं की, वाद एवढा वाढला. (वाचा- राऊतांनी केलेलं मोदींचं कौतुक पटोलेंना पटेना, म्हणाले-सर्टिफिकेट देणारे ते कोण? ) उत्तर भारतामधील पंचाग प्रतिपदा ते अमावस्या असं असतं. त्यामुळं त्यांच्याकडं नुकतीच वटपौर्णिमा झाली. या वट पौर्णिमेच्या निमित्तानं कानपूरमध्ये एका महिलेनंही पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केलं होतं. वटवृक्षाची पुजा केल्यानंतर पत्नी घरी आली. त्यानंतर तिनं पतीकडं सेल्फीसाठी आग्रह केला. त्यानंतर दोघांनी पतीच्या फोनमध्ये सेल्फी काढलाही. हा सेल्फी पाहण्यासाठी पत्नीनं पतीचा फोन घेतला. पण सेल्फी पाहिल्यानंतर इतर फोटो पाहताना पत्नीला पतीच्या फोनमध्ये दुसऱ्या एका महिलेबरोबरचे त्याचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो दिसले. मग काय महिलेचा पारा भलताच चढला. (वाचा- 21 दिवस 2100 बळी; आता भयंकर ठरतोय हा आजार, कोरोनामुक्त रुग्णांना सर्वाधिक धोका ) ते फोटो पाहताच महिलेला राग अनावर झाला. तिनं पुजेचं ताट फेकून दिलं आणि चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर तिनं पतीचा हात धरला आणि अक्षरशः त्याला फरफटत पोलिस ठाण्यात घेऊन गेली. त्याठिकाणीही चांगलाच ड्रामा झाला. पतीचा कारनामा दाखवत पत्नीनं अश्लिल फोटो पोलिसांनाही दाखवला आणि पतीवर कारवाई करण्याची मागणी केली. या सर्व प्रकारामध्ये पतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पती वारंवार पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तो पत्नीसमोर पोलीस ठाण्यात हात जोडत होता, पण पत्नी काहीही केल्या ऐकायला तयार नव्हती. अखेर पतीनं पत्नीचे पाय धरले आणि तिची माफी मागितली, त्यानंतर ती काहीशी शांत झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना समजावून घरी पाठवलं, पण एका सेल्फीनं पतीची चांगलीच तारांबळ उडाली.