श्रीनगर, 16 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय दलाला दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लष्कर, वायुदल आणि सर्व सुरक्षा सैनिकांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सीमेपलीकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सैन्यदलाला आणि सुरक्षादलांना कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तैनात राहा, असा इशारा देण्यात आला आहे.
utf-8">ॉ दरम्यान जम्मू काश्मीरचे चीफ सेक्रेटरी बीव्हीआर सुब्रमण्यम BVR Subrahmanyam यांनी श्रीनगरमधली संचारबंदी आणि कम्युनिकेशनवर असलेली बंधनं हळूहळू मागे घेण्याची घोषणा केली आहे. शनिवारपासूनच मोबाईल आणि अन्य संपर्काची साधनं सुरू होतील आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थासुद्धा हळूहळू सुरू करण्यात येईल.
श्रीनगरमधली शाळा - कॉलेज सोमवारपासून उघडणार आहेत. कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतर आणि जम्मू काश्मीर राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. काश्मीर खोऱ्यात शांतता राहावी, यासाठी हा निर्णय घेतला होता, असं सुब्रमण्यम यांनी सांगितलं. ईदनिमित्त हे निर्बंध शिथिल कऱण्यात आले होते आता सोमवारपासून हे निर्बंध हटवण्यात येतील. शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO