JOIN US
मराठी बातम्या / देश / आयटी कंपनीतील ऑफर लेटरमधील 'ही' गोष्ट चर्चेत; विप्रो, TCS, Infosys सारख्या कंपनीचा यामध्ये समावेश

आयटी कंपनीतील ऑफर लेटरमधील 'ही' गोष्ट चर्चेत; विप्रो, TCS, Infosys सारख्या कंपनीचा यामध्ये समावेश

अनेक लोकांना आयटीमधील मोठ-मोठ्या कंपनी जसे विप्रो, टाटा, इन्फोसीसमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं. परंतू तुम्हाला या कंपनीबद्दल ही गोष्ट माहित नसावी.

जाहिरात

10,000 जागांसाठी भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 सप्टेंबर : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत. जे आयटी कंपनीत जॉब करतात. तसे पाहाता गलेलठ्ठं पागर. सुट्ट्या आणि सोबत मिळणाऱ्या काही सुट आणि गिफ्ट हे नेहमीच आयटीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. अनेक लोकांना आयटीमधील मोठ-मोठ्या कंपनी जसे विप्रो, टाटा, इन्फोसीस सारख्या कंपनीमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं. परंतू तुम्हाला या कंपनीबद्दल ही गोष्ट माहित नसावी. कदाचित तेथे काम करणाऱ्या काही लोकांना देखील याबाबत माहित असावं. तुम्ही कधी मूनलाइटिंग हा शब्द ऐकला आहे? नसेल तर चला याबद्दल आधी जाणून घेऊ. मूनलाइटिंग म्हणजे कंपनीच्या निश्चित कामाच्या तासांनंतर, एखादा कर्मचाऱ्यारी त्याचे दुसरे काम करु शकतो, जसे की, फ्रिलांसिंग आणि हे काम करण्यासाठी तो मोकळा आहे. परंतू असं असलं तरी देखील अनेक अशा आयटी कंपन्या आहेत, ज्या याला विरोध दर्शवतात आणि याबाबत ते त्यांच्या ऑफर लेटरमध्ये देखील लिहितात. परंतू याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नसते. खरंतर आयटीमध्ये दोन वेगवेगळे वर्ग आहेत. काही कंपन्यांना मूनलाइटिंगबाबत हरकत वाटत नाही, तर काही कंपन्यांसाठी हे फ्रॉड आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची नोकरी देखील जाऊ शकते. चला जाणून घेऊया याबाबत कोणती कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला काय सुट देते एका व्यावसायिक वेबसाइटने या संदर्भात दिग्गज कंपन्यांनी जारी केलेल्या नियुक्ती पत्राशी संबंधित माहिती दिली. त्यांनी अशा कंपन्यांबाबत सांगितलं आहे, ज्यांनी ‘जॉब कॉन्ट्रॅक्ट’मध्ये मूनलाइटिंगला सपोर्ट केला आहे की नाही ते. TCS देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कर्मचार्‍यांना नोकरीशिवाय इतर काम करू देत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला तसे करायचे असल्यास त्याला यासाठी लेखी मान्यता घ्यावी लागते. कंपनीचे सीईओ गणपति सुब्रमण्यम सांगतात की मूनलाइटिंग करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ फायदा होतो पण दीर्घकाळात त्याचे तोटा होतो. ज्यामुळे त्यांचा यासाठी विरोध आहे. हे वाचा : रडगाणं सांगू नका, 18 तास काम करा; सल्ला देणाऱ्या बड्या कंपनीच्या CEO ने मागितली माफी इन्फोसिस इन्फोसिस मूनलाइटिंगच्या विरोधात आहे. कंपनीच्या अटी स्पष्टपणे सांगतात की तुम्ही इन्फोसिसच्या संमतीशिवाय तुम्ही तुमच्या कामानंतर काहीही करु शकता. कंपनीचे माजी संचालक मोहनदास पै मूनलाइटिंग योग्य असल्याचे मानतात. ऑफिसच्या वेळेनंतर कोणी काय करायचं, हा त्या कर्मचाऱ्यांचा निर्णय आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. विप्रो विप्रोच्या ऑफर लेटरमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की, कर्मचाऱ्यांना केवळ कंपनीसाठी काम करावे लागेल. इतर कोणत्याही कामासाठी कर्मचाऱ्याला व्यवसाय युनिट प्रमुखाची परवानगी घ्यावी लागेल. विप्रोच्या कार्यकारी अध्यक्षांनी मूनलाइटिंगला चुकीचे म्हटले आणि त्यांनी याला कंपनीची फसवणूक असल्याचे म्हटलं आहे. टेक महिंद्रा टेक महिंद्राच्या करारात असे लिहिले आहे की, जर तुम्ही कंपनीच्या मंजुरीशिवाय कोणतेही काम हाती घेतले तर तुम्हाला कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकले जाऊ शकते. मात्र, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीपी गुरनानी यांचे याबाबत वेगळं मत आहे. ते म्हणतात की जर कर्मचांनी त्यांचे काम पूर्ण केले असेल, तर ते पुन्हा दुसरे काम करू शकते. हे वाचा : विमानासोबत घडली अशी घटना, ज्यावर पोलिसांनाही विश्वास ठेवणं झालं कठीण, नक्की असं काय घडलं? एचसीएल टेक एचसीएल टेक्नॉलॉजीच्या करारात कंपनीचा कोणताही कर्मचारी इतर कोणत्याही कंपनीसाठी कोणतेही काम करू शकत नाही, असे लिहिले आहे. यामध्ये कंपनी दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रातली असली तरी देखील मूनलाइटिंगला नाही म्हटलं आहे. HCN ने याला नोकरीची अनिवार्य अट म्हटले आहे आणि असे करणे हे नोकरीच्या अटींचे उल्लंघन आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या