जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रडगाणं सांगू नका, 18 तास काम करा; सल्ला देणाऱ्या बड्या कंपनीच्या CEO ने मागितली माफी

रडगाणं सांगू नका, 18 तास काम करा; सल्ला देणाऱ्या बड्या कंपनीच्या CEO ने मागितली माफी

रडगाणं सांगू नका, 18 तास काम करा; सल्ला देणाऱ्या बड्या कंपनीच्या CEO ने मागितली माफी

तुमचं रडगाणं सांगू नका, 18 तास काम करा असा सल्ला देणारा एका बड्या कंपनीचा CEO अडचणीत आला आहे. सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्यानंतर या CEO ला माफी गाण्याची वेळ आली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुमचं रडगाणं सांगू नका, 18 तास काम करा असा सल्ला देणारा एका बड्या कंपनीचा CEO अडचणीत आला आहे. सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्यानंतर या CEO ला माफी गाण्याची वेळ आली. आधी त्यांनी लिंक्‍डइनवर नवख्या तरुणांनी कसं 18 तास झोकून काम करायला हवं यावर बराच मोठा लेख लिहिला. त्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगचे शिकार झाले. तरुणांना दिवसाचे 18 तास काम करण्याचा सल्ला बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शांतनू देशपांडे यांनी लिंक्डइनवरून दिला. त्यानंतर लोकांनी संताप व्यक्त करताच पहिल्या पोस्टबद्दल त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे. शांतनू देशपांडे यांनी त्यांच्या एका लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही 22 वर्षांचे असाल आणि कंपनीत नवीन असाल तर तुम्ही स्वतः त्या नोकरीमध्ये झोकून दिलं पाहिजे. चांगले खा आणि तंदुरुस्त राहा, पण किमान 4-5 वर्षे दररोज 18 तास काम करत राहा. कामाची पूजा करा पण त्यावरून रडत राहू नका. हेही वाचा-  एका पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी, सर्वात साक्षर राज्यातला धक्कादायक VIDEO

News18

तरुणांना ऑनलाईन सगळ्या गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. कुटुंब आणि काम यामधील संतुलन राखतात. कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्वाचं वाटतं एवढ्या लवकर हे सगळं करण्याची गरज नाही असे शांतनू यांचं म्हणणं आहे. करिअरच्या पहिल्या ५ वर्षांत तुम्हाला जे मिळाले ते आयुष्यभरासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे जीव ओतून काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हेही वाचा- जगातील सगळ्यात महागडी कॉफी, ती ज्या पदार्थापासून बनते, हे तुम्हाला कळलं तर कदाचित तुम्ही ती फ्रीमध्ये ही पिणार नाहीत यामुळे युजर्सनी शांतनू यांना ट्रोल केलं आहे. नोकरी करणारे लोक आपल्या बॉसचे गुलाम होतील. यामुळे बॉस फक्त श्रीमंत होईल असंही एका युजरने म्हटलं आहे. अशा लोकांमुळे गुलामी करणाऱ्यांची एक नवीन जनरेशन तयार होईल. अनेक युजर्सनी त्यांना यावरून प्रश्नही केले आहेत. अखेर सगळ्यांचा संताप पाहून शांतनू यांना माफी मागावी लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात