JOIN US
मराठी बातम्या / देश / भारताचं मोठं यश; पुलवामा हल्ल्यातील आणखी एक आरोपी ताब्यात

भारताचं मोठं यश; पुलवामा हल्ल्यातील आणखी एक आरोपी ताब्यात

अवघ्या एका वर्षांच्या आत 119 दहशतवादी मारण्यात आले आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 जुलै : पुलवामा हल्ल्यातील आणखी एका आरोपीला भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केले आहे. एनआयएने मोहम्मद इक्बाल राठर नावाच्या आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद इक्बालवर पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी फारूक ओमरला मदत केल्याचा आरोप आहे. फारूक याने पुलवामा हल्ल्यात वापरल्या गेलेल्या आयईडीची व्यवस्था केली होती. या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. पुलवामा हल्ल्यात सक्रिय भूमिकेचा आरोप नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनुसार (NIA) मोहम्मद इक्बाल याच्या चौकशी दरम्यान तो पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरांशी संपर्कात असल्याचे आढळले आहे. त्याच्या सांगण्यावरून त्याने फारूकला दक्षिण काश्मीरमध्ये पाठविले. यानंतर त्याने फारूकला मदत केली. इक्बाल याला सात दिवसांच्या रिमांडवर घेण्यात आले आहे. एनआयए आता अधिक चौकशी करून या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे वाचा- कोरोना रुग्णांना लुबाडणाऱ्या नामांकित रुग्णालयाला BMC चा दणका; FIR दाखल

संबंधित बातम्या

सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात मोहीम राबविली विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी यावेळी दहशतवाद्यांविरूद्ध मोठी मोहीम राबविली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह याने सांगितले होते की, गेल्या चार वर्षांत प्रथमच दहशतवादी गटात सामील झालेल्यांपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 119 दहशतवाद्यांचा खात्मा अवघ्या एका वर्षांच्या आत 119 दहशतवादी मारण्यात आले आहे. यामध्ये टॉप कमांडर रियाज नायकू, अब्दूल रहमान उर्फ फौजी भाई, जुबैर, कारी यासिर, जुनैद सहरी, बुरहान कोका आणि तैयब वालिद यांचा समावेश आहे. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या