नवी दिल्ली, 28 मे : मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, पुणे, ठाणे, चेन्नई देशातील सर्वात मोठी शहरं. आज याच मेगासिटींचे (megacity) कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) हाल झालेत. भारतातील कोरोनाव्हायरसच्या एकूण प्रकरणांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणं आणि मृत्यू या शहरांमध्ये झालेत. छोट्या छोट्या शहरांच्या तुलनेत या मोठ्या आणि देशाचा गाडा हाकणण्यात जास्त हातभार असलेल्या या शहरांचीच अवस्था बेकार झाली आहे आहे. भारतात कोरोनाव्हायरसची एकूण 1,51,766 प्रकरणं आहेत. त्यापैकी या सहा शहरांमध्ये 82,974 प्रकरणं आहेत. म्हणजे जवळपास 54.67% या शहरात आहेत. तर देशातील एकूण 4,337 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी 2,571 मृत्यू म्हणजे 59.28% या शहरात झालेत. हे वाचा - महाराष्ट्रात IPS आणि IAS अधिकाऱ्यांनाही कोरोनाने ग्रासलं एकूण 6 शहरांपैकी 3 शहरं तर फक्त महाराष्ट्रातीलच आहेत. मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांवर कोरोनाव्हायरसचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेले राज्य आहे. एकूण प्रकरणांपैकी 34.7% प्रकरणं फक्त महाराष्ट्रात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि टेक्सटाइल कॅपिटल अहमदाबाद यांची परिस्थिती तर खूपच गंभीर आहे. शहरं प्रकरणं मृत्यू मुंबई 32791 1065 पुणे 5996 274 ठाणे 6958 93 दिल्ली 15257 303 अहमदाबाद 10841 745 चेन्नई 11131 91
या शहरांमधील 5 दिवसांचा ग्राफ पाहता अहमदाबादमधील प्रकरणांचा ग्राफ थोडा स्थिरावला आहे. मात्र मुंबईत तो वेगाने वाढतो आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रकरणं आहेत ती मुंबईत. मुंबईतील धारावी, दादर, माहीम परिसरात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद आहे. त्यामुळे मुंबईचा हा आकडा वाढताना दिसतो आहे. हे वाचा - पुणेकरांसाठी GOOD NEWS ! तब्बल अर्धे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले बरे कोरोनाची प्रकरणं वाढत असल्यानं आता या महानगरांनी मृत्यूदर कमी करणं आणि रिकव्हरी रेट वाढवणं यावरच लक्ष केंद्रीत केलं आहे. लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं