नवी दिल्ली, 20 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील भारत-ऑस्ट्रेलिया व्हर्च्युअल समिट (India-Australia Virtual Summit) 21 मार्च रोजी होणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांची आभासी (virtual) बैठक होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली. शिखर परिषदेच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियानं एक मोठी घोषणा केली आहे. भारतातील विविध क्षेत्रात 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक (Australian Investment in India) करणार असल्याचं ऑस्ट्रेलियानं सांगितलं. हे वाचा - पुढील 5 वर्षांत जपान भारतात 42 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार : पंतप्रधानांची माहिती वृत्तसंस्थेनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया शिखर परिषदेत महत्त्वाच्या खनिजांच्या क्षेत्रात सामंजस्य करार करणार आहेत. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियातून धातू, कोळसा आणि लिथियमची भारतातली आयात वाढेल. वृत्तसंस्थेनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया या महिन्याच्या अखेरीस व्यापार करार करणार आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारनं भारतात आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. The India-Australia bilateral summit will be held tomorrow, March 21, post the meeting between PM Modi & Australian PM Scott Morrison.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत खूप मजबूत झाले आहेत. दोन्ही देश द्विपक्षीय संबंध मजबूत आणि विस्तारण्यासाठी वेगानं काम करत आहेत. सूत्रांनुसार, या समिटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देश प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करू शकतात.