नवी दिल्ली, 1 जून : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच 100.40 कोटींची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या 2019-2020 या काळात जनऔषधी केंद्रांची विक्री 44.60 कोटी इतकी होती. मार्च, एप्रिल आणि मेमध्ये जनऔषधी केंद्रांनी 144 कोटी रुपयांची परवडणारी आणि दर्जेदार औषधांची विक्री केली. कोविड - 19 च्या साथीच्या काळात जनतेची एकूण 800 कोटी रुपयांची बचत केली आहे. रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा म्हणाले, कोविड - 19 (साथीचा रोग) मुळे देशभरातील नागरिकांना या कठीण काळात औषधांची पूर्ण उपलब्धता सुनिश्चित करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. पंतप्रधान भारती जनऔषधी केंद्रांच्या (पीएमबीजेके) नेटवर्कच्या माध्यमातून पंतप्रधान भारतीय जनउद्योगी योजना (पीएमबीजेपी) राबवित असताना बीपीपीआयने घेतलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले. जनऔषधी केंद्रांनी एप्रिल 2020 मध्ये 52 कोटी आणि मार्चमध्ये 42 कोटी रुपयांची विक्री केली. बीपीपीआयमध्ये सध्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. यामध्ये सध्या फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, पॅरासिटामोल आणि अॅझिथ्रोमाइसिन आहे. बीपीपीआयने मार्च आणि एप्रिल 2020 मध्ये सुमारे 1 दशलक्ष फेस मास्क, हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या 5 दशलक्ष औषधांची विक्री केली आहे. बीपीपीआयने अनुकूल देशांना पुरवठा करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला औषधेही दिली आहेत. सरकारच्या सोशल डिस्टन्सिंग पद्धतीस पाठिंबा दर्शविणारे पीएमबीजेके फार्मासिस्ट आता ‘आरोग्य सैनिक’ म्हणून ओळखले जातात. रुग्ण आणि वृद्धांना घरी औषधे देण्याचे काम करीत आहेत. ‘जनौषधी सुगम’ मध्ये 4 लाखाहून अधिक झाले डाऊनलोड याव्यतिरिक्त, बीपीपीआय आपल्या सोशल मीडियावर विविध व्यासपीठांवर साथीच्या विरूद्ध लढा देण्याच्या माध्यमांबद्दल जागरूकता निर्माण करीत आहे. ‘जनऔषधि सुगम’ हा मोबाईल application खूप लोकप्रिय झाले आहे. शिवाय याचे 4 लाखांहून अधिक डाऊनलोड्स झाले आहेत. या मार्गांनी, कोविड – 19 च्या उद्रेकाविरूद्धच्या लढ्यात बीपीपीआय सक्रिय भूमिका निभावत आहे. हे वाचा- भाजपने सुरू केली ‘महिला आत्मानिर्भर योजना’; देवेंद्र फडणवीसांनी केला शुभारंभ