JOIN US
मराठी बातम्या / देश / 'मी कोरोना पॉझिटिव्ह', Tiktokवर व्हिडीओ टाकणाऱ्या तरुणावर पोलिसांनी केले असे उपचार

'मी कोरोना पॉझिटिव्ह', Tiktokवर व्हिडीओ टाकणाऱ्या तरुणावर पोलिसांनी केले असे उपचार

एकीकडे अफवा आणि भीती पसरवू नये, यासाठी पोलीस आवाहन करत असताना दुसरीकडे लोक मात्र सोशल मीडियावर अफवा पसरवत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंजाब, 22 मार्च : कोरोनामुळे देशभर कहर माजला आहे. भारतात रुग्णांची संख्या 300हून जास्त असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. तर आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे अफवा आणि भीती पसरवू नये, यासाठी पोलीस आवाहन करत असताना दुसरीकडे लोक मात्र सोशल मीडियावर अफवा पसरवत आहेत. पंजाबच्या संगरूर येथे पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे. या तरुणाने टिकटॉवर ‘मी कोरोना पॉझिटिव्ह’ असा व्हिडीओ अपलोड केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणाने टिकटॉकवर व्हिडीओ बनविला होता. यात त्याने, ‘मी हरलो नसतो, पण चीनने मला हरवले. जर जिवंत असेल तर मी पुन्हा व्हिडीओ करेन’, असे म्हटले होते. या व्यक्तीचा टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रशासन गावात पोहोचले आणि त्याची तपासणी केली पण त्यात कोरोना विषाणूची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी कारवाई करून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. व्हिडीओ अपलोड केलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची खोटी माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा व्हि़डीओ आता डिलीट करण्यात आला आहे. दरम्यान, अफवा पसरवणाऱ्या या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीविरोधात कलम 505 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीची चौकशी करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या