या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले, पैकी 83 हजार 97 रुग्ण बरे होऊन परतले आहेत.
नवी दिल्ली 07 एप्रिल : कोरोना रुग्णांचा संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंग शिवाय पर्याय नाही असं सरकार वारंवार सांगत आहे. फक्त घरी बसा आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत करा एवढच काम नागरीकांना करायचं आहे. पण अजुनही शहरांमध्ये नागरीक बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने काही धक्कादायक माहिती जाहीर केलीय. एक कोरोनाचा रुग्ण जर घराबाहेर पडला तर तो 30 दिवसांमध्ये तब्बल 406 जणांना व्हायरसची लागण करू शकतो असं अभ्यासातून आढळून आलं आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. त्यामुळे नागरीकांनी लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलंच पाहिजे असंही ते म्हणाले. आता देशभरात कोरोना रुग्ण शोधण्यासाठी अतिशय वेगाने टेस्टिंग होत असून गेल्या 24 तासांमध्ये 11,795 टेस्ट झाल्या आहेत. तर देशात आत्तापर्यंत 1,07,006 टेस्ट झाल्याची माहितीही त्यांनी दिली. रेल्वेने ट्रेन्समध्ये 40 हजार आयसोलेशन बेड्स तयार केले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या तीन गोष्टींवर सरकारचा भर असल्याचंही त्यांनी सांगितलं. सावधान ‘कोरोना व्हायरस’चा मुंबईला विळखा, 4 वॉर्ड अतिधोकादायक जाहीर आतापर्यंत कोरोनाने (Covid - 19) देशात 4200 चा आकडा पार केला आहे. त्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. मात्र देशातील असा एक भाग आहे जेथे कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. त्याचं नाव ‘भीलवाडा’. त्यामुळे येत्या काळात देशभरात ‘भीलवाडा मॉडेल’ (Bhilwara Model) लागू करण्याबाबत विचार केला जात आहे. राजस्थानमधील भीलवाडामधील कोरोना व्हायरससोबत लढा देण्याची पद्धती संपूर्ण देशात लागू होऊ शकतो. केंद्रीय कॅबिनेट मंत्री सचिव राजीव गौबा यांनी प्रदेशाचे मुख्य सचिव डीबी गुप्ता यांच्याकडे भीलवाडा मॉडेल संदर्भात सविस्तर माहिती मागवली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गहलोट आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सांगण्यात आले आहे. गुप्ता यांनी सांगितले की कॅबिनेट सचिव गौबा यांनी भीलवाड्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरलेल्या उपायांचं कौतुक केलं आहे आणि हा मॉडेल देशभरात लागू करण्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनी यासंदर्भात माहिती मागवली आहे. अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.