JOIN US
मराठी बातम्या / देश / विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाचा 'वीर चक्र' पुरस्कारासाठी प्रस्ताव

विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाचा 'वीर चक्र' पुरस्कारासाठी प्रस्ताव

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाचा प्रस्ताव ‘वीर चक्र’ पुरस्कारासाठी पाठवण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 एप्रिल : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाचा प्रस्ताव ‘वीर चक्र’ पुरस्कारासाठी पाठवण्यात आला आहे. बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक कारवाईनंतर पाकिस्तानी वायुसेनेनं भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यावेळेस विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी धाडस करून पाकचं एफ-16 विमान पाडलं होतं. यादरम्यानच, त्याच्यादेखील मिग-21 क्रॅश झालं आणि अपघातग्रस्त विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. यानंतर तब्बल तीन दिवसांनंतर अभिनंदन यांची पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका झाली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांच्यासहीत पाकिस्तानविरोधात एअर स्ट्राईक करणाऱ्या ‘मिराज 2000’च्या 12 जवानांचीही नावं वायुदलाने पुरस्कारासाठी पाठवली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची बदली दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन आता विमान चालवणार का? याची उत्सुकता साऱ्या भारतीयांनी लागून राहिली होती. पण, तुम्हा सर्वांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण, विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर आता वायुदलानं नवी जबाबदारी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांना श्रीनगर येथे न ठेवता त्यांच्यावर आता वेस्टर्न सेक्टरची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतात आल्यानंतर अभिनंदन केव्हा सेवेत रूजू होणार याची प्रतीक्षा तमाम भारतीयांना होती. पण, त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. वाचा अन्य बातम्या SPECIAL REPORT: सत्तारांच्या हकालपट्टीनंतर विखेंवरही टांगती तलवार VIDEO: खासदार हिना गावित यांचा शेतीचा अजेंडा काय आहे? SPECIAL REPORT :…जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात धावत्या लोकलमध्ये तरुणांकडून जीवघेणा स्टंट, VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या