JOIN US
मराठी बातम्या / देश / मुस्लीम मुलीशी प्रेमविवाह केलेल्या त्या तरुणानं पत्नीला ईदच्या खरेदीला नेण्यासाठी विकली होती स्वतःची सोनसाखळी

मुस्लीम मुलीशी प्रेमविवाह केलेल्या त्या तरुणानं पत्नीला ईदच्या खरेदीला नेण्यासाठी विकली होती स्वतःची सोनसाखळी

‘अश्रीनच्या मोठ्या भावाने या जोडप्याचा बदला घेण्याची शपथ घेतली होती आणि हे जोडपं त्याला खूप घाबरलं होतं. त्याला (नागराजू) अश्रीनच्या सुरक्षेची काळजी होती म्हणून तो रोज कामावर जात असताना तो तिला सरूरनगर येथील त्याच्या बहिणीच्या घरी सोडत असे.’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 7 मे : ऑनर किलिंगच्या संशयास्पद प्रकरणात 25 वर्षीय कार शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या बिल्लीपुरम नागराजू यांची भररस्त्यात हत्या करण्यात आली. मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह केल्यानंतर त्यांना पत्नीच्या भावाने भयानक मृत्यू दिला. या जोडप्याविषयी अनेक बाबी समोर येत आहेत. नागराजू यांच्या मित्राने नुकतीच अशी माहिती दिली आहे की त्यांनी (नागराजू) स्वतःच्या पत्नीला ईदच्या खरेदीसाठी नेण्यासाठी स्वतःची सोन्याची चेन 25 हजारांना विकली होती. नागराजू यांना काहीही कारण नसताना केवळ आंतरधर्मीय विवाह केल्यावरून असा मृत्यू आल्याने समाजातून हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुण आणि त्याला पत्नीला सहानुभूती मिळत आहे. तसंच, पत्नी सुल्ताना हिचा भाऊ आणि नातेवाईकांविषयी संताप व्यक्त होत आहे. नागराजू यांची सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या देखत निर्घृणपणे हत्या झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेची तीव्रता इतकी आहे की, तेलंगणा राज्याबाहेरही याचे पडसाद उमटत आहेत. बुधवारी रात्री हैदराबादमधील सरूरनगर येथे ही घटना उघडकीस आली जेव्हा मृताची पत्नी अश्रीन सुलताना सय्यदसोबत मोटारसायकलवरून जात असताना स्कूटरवरून आलेल्या सय्यद मोबीन अहमद आणि मोहम्मद मसूद अहमद या हल्लेखोरांनी त्यांना अडवल्याचं सांगण्यात येत आहे. भररस्त्यात सार्वजनिक ठिकाणी नागराजू यांच्यावर प्रथम लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला यानंतर त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले आणि ते जागीच ठार झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कार शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नागराजू यांनी काम केले होतं. चारमिनार येथे पत्नीला ईदसाठी खरेदी करण्यासाठी नेण्यासाठी त्यांनी स्वतःची सोन्याची साखळी विकली होती, असं त्यांच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे. “त्याने मला सांगितलं की पत्नीला ईदच्या खरेदीसाठी चारमिनारला घेऊन जाण्यासाठी त्याने त्याची सोनसाखळी 25,000 रुपयांना विकली. तो एक अतिशय प्रामाणिक आणि मेहनती व्यक्ती होता. तो सहसा घरी जाण्यापूर्वी त्याच्या कॅज्युअल कपडे घालत असे. परंतु, बुधवारी संध्याकाळी तो कंपनीच्या गणवेशात घरी निघून गेला. कारण, त्याला उशीर होत होता आणि त्याला त्याच्या पत्नीला त्याच्या बहिणीच्या घरातून सोबत घ्यावे लागत होते," असं के. सतीश यांनी वृत्तपत्राला सांगितले. नागराजू मलकपेठ परिसरातील कार शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. हे वाचा -  मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह, भररस्त्यात लोकांच्या देखत तरुणाचा भयंकर शेवट

 सय्यद मोबीन अहमदचा नागराजूसोबतच्या आपल्या बहिणीच्या नात्याला विरोध होता आणि त्याने तिला त्याविषयी इशाराही दिला होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नागराजूचा मित्र तलारी दानियाचा हवाला देऊन असं म्हटलं आहे की, हे जोडपं सय्यद मोबीनला घाबरत होतं.

‘अश्रीनच्या मोठ्या भावाने या जोडप्याचा बदला घेण्याची शपथ घेतली होती आणि हे जोडपं त्याला खूप घाबरलं होतं. त्याला (नागराजू) अश्रीनच्या सुरक्षेची काळजी होती म्हणून तो रोज कामावर जात असताना तो तिला सरूरनगर येथील त्याच्या बहिणीच्या घरी सोडत असे.’ हे वाचा -  मुकी असल्यावरून सततचे टोमणे, मारहाण.. भडकलेल्या बायकोनं घडवली जन्माची अद्दल तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी या हत्येबाबत राज्य सरकारकडून “तपशीलवार अहवाल” मागितला आहे. राजभवनच्या प्रेस कम्युनिकनुसार, ‘राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी GHMC परिसरातील सरूरनगर येथे 04-05-2022 रोजी रात्री बी. नागराजूच्या भीषण हत्येबाबत विविध माध्यमांतील वृत्त पाहिलं आहे. त्यांच्या आंतरधर्मीय विवाहामुळे त्यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे’. याबाबत त्यांनी सरकारकडून हत्येचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या