JOIN US
मराठी बातम्या / देश / पाण्यापेक्षाही स्वस्त झाल्या कच्च्या तेलाच्या किंमती, भारतात पेट्रोलचे दर कमी होणार?

पाण्यापेक्षाही स्वस्त झाल्या कच्च्या तेलाच्या किंमती, भारतात पेट्रोलचे दर कमी होणार?

भारतात लॉकडाऊन असल्यामुळे सध्या पेट्रोलची मागणीच नाही. कारखाने, उद्योग बंद असल्याने त्या पातळीवरही मागणी नाही.

जाहिरात

A pumpjack is pictured as the sun sets Tuesday, April 21, 2020, in Oklahoma City. Oil prices continue to drop, because very few people are flying or driving, and factories have shut amid widespread stay-at-home orders due to coronavirus concerns. (AP Photo/Sue Ogrocki)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 25 एप्रिल: जगात कोरोनामुळे सगळं अर्थचक्र कोलमडून गेलं आहे. सगळ्या जगातले व्यवहारच थंडावल्याने तेलाची मागणी कमालीची घटली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती शुन्याच्याही खाली गेल्या होत्या. आता त्यात थोडीशी सुधारणा झाली असून त्या 17 डॉलर प्रति डॉलर एवढ्या झाल्या आहेत. या कमी झालेल्या किंमतींचा फायदा भारताला सध्या तरी होणार नाही. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर त्याचा फायदा भारताला मिळू शकतो. सध्या प्रति बॅरल कच्च्या तेलाचे भाव 17 रुपये आहे. एका बॅरलमध्ये 159 लिटर तेल असते. सध्या एका डॉलरची किंमत 76 रुपये आहे. त्यामुळे एका बॅरल ची किंमत 1292 एवढी होते. तर एक लिटरची किंमत 8.12 रुपये एवढी होते. देशात पाण्याच्या एका बाटलीची किंमत ही सरासरी 20 एवढी आहे. त्यामुळेच तेल हे पाण्यापेक्षाही स्वस्त झालं असं म्हटलं जात आहे. भारतात लॉकडाऊन असल्यामुळे सध्या पेट्रोलची मागणीच नाही. कारखाने, उद्योग बंद असल्याने त्या पातळीवरही मागणी नाही त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर जशी मागणी वाढेल तसा भारताला त्याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र कोरोनामुळे उत्पन्न घटल्याने सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे सरकार उत्पन्नाचा मोठा स्रोत असलेल्या तेलाच्या किंमती कमी करणार नाही असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र काही प्रमाणात जरी किंमती कमी झाल्या तरी त्याचा फायदा समान्य माणसांना मिळणार आहे.

कोरोना विषाणूची प्रकरणं वाढतच आहेत. शनिवारी सकाळी कोविड -19 मधील रुग्णांची संख्या 24 हजारांवर पोहोचली. तर 775 लोक मरण पावले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 24,506 झाली आहे. यात आतापर्यंत 5063 रूग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत 57 मृत्यू झाले आहेत. या व्यतिरिक्त 1429 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या