गोवा, 22 मार्च : गोव्याची राजधानी पणजी (Panjim ) महानगरपालिकेसह (Panjim Municipal Corporation Election 2021) ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजप (BJP) पुरस्कृत गटाने जोरदार मुसंडी मारत पालिकेवर झेंडा फडकावला आहे. बहुमतासाठी लागणारा आकडा भाजपने पार केला आहे. त्यामुळे काँग्रेस पुरस्कृत गटासह अपक्षांचा धुव्वा उडाला आहे. गोव्यात पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली. एकूण 30 जागांसाठी ही मतमोजणी घेण्यात आली होती. जाहीर झालेल्या निकालानुसार, 30 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. 30 पैकी 25 जागा भाजपने जिंकल्या आहे. 25 जागांवर भाजप पुरस्कृत प्रोग्रेस फॉर टूगेदर या पॅनेलचे उमेदवारांनी विजय मिळवला आहे. बहुमतासाठी लागणारा 16 जागांचा जादुई आकडा भाजपने गाठला आहे. त्यामुळे पणजी महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे पुरस्कृत केवळ 5 जण निवडून आले. अन्य निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपने जोरदार आघाडी घेतली होती. अखेर ही आघाडी आता विजयामध्ये रुपांतरीत झाली आहे. हा नारिंगी रंगाचा फायरफॉल वाहतो उंच पर्वतावरून, पाहण्यासाठी लोक येतात जगभरातून कोरोनामुळे लांबलेल्या स्थानिक निवडणूक अखेर पार पडत आहे. गोव्यात महापालिका, 6 ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेच्या एका प्रभागासाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सोळा वर्ष तुरुंगात घालवले, सुटका होण्याच्या मार्गावर असतानाच झाला मृत्यू पणजी महानगरपालिकेसह 6 नगरपालिकांचे आज मतमोजणी होत आहे. यात डिचोली, पेडणे, वाळपई, कुडचडे, कानकोन आणि कुंकळी या नगरपालिकांचा समावेश आहे. याबरोबरच नावेली जिल्हा पंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून ग्रामपंचायतींच्या अठरा जागांसाठी पोट निवडणूकींची मतमोजणी आज होत आहे. साडेआठ वाजता मतमोजणी ला सुरुवात होत असून 11 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. तसंच, पणजी महानगरपालिका आणि सहा नगरपालिकांच्या 421 जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. एकूण 423 उमेदवारांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे.