JOIN US
मराठी बातम्या / देश / Lockdown असतांनाच भाजपच्या आमदाराची दारु पार्टी, कार्यकर्त्यांसोबत केली मौज; पाहा VIDEO

Lockdown असतांनाच भाजपच्या आमदाराची दारु पार्टी, कार्यकर्त्यांसोबत केली मौज; पाहा VIDEO

मुख्यमंत्री लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा अशी मागणी करत असताना भाजपचा आमदार अशा प्रकराचं वर्तन करतो हे धक्कादायक असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पणजी 6 जुलै: देशभर अजुनही लॉडाऊन सुरूच आहे. त्यात काही सवलती असल्याने त्याला Unlock असं नाव देण्यात आलंय. मात्र अजुनही निर्बंध कायम आहे. सार्वजनिक समारंभ आणि उत्सवावर कडक निर्बंध आहेत. असे निर्बंध असतानाच गोव्यात सत्ताधारी भाजपच्या आमदारानेच दारु पार्टी केल्याचं उघड झालं आहे. भाजपचा हा आमदार कार्यकर्त्यांसह डान्स करत असल्याचंही आढळून आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गोव्यात अजुनही पार्टी करण्यावर निर्बंध आहेत असं असतानाही भाजपचे आमदार Glenn Souza Ticlo यांनी दारु पार्टी करत कार्यकर्त्यांसह मौज-मजा केल्याचं पुढे आलं आहे. याचा VIDEO व्हायरल झाला असून आमदारांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी विरोधपक्ष असलेल्या काँग्रेसने  केली आहे. हे आमदार आणि कार्यकर्ते दारुच्या बाटल्या हातात घेऊन नाचत असून असल्याचं दिसत आहे. यावर वाद झाल्यानंतर या आमदारांनी स्पष्टिकरण देतांना सांगितलं की, मी पार्टी केली नाही, फक्त काही ओळखीच्या लोकांनी बोलावल्याने मी तिथे गेलो होतो.

पण त्यांच्या या उत्तराने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचं समाधान झालं नाही. या आमदारावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केलीय. मुख्यमंत्री लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा अशी मागणी करत असताना भाजपचा आमदार अशा प्रकराचं वर्तन करतो हे धक्कादायक असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या