JOIN US
मराठी बातम्या / देश / Goa Assembly Election Result Updates : गोव्यात भाजपची आघाडी; काँग्रेससोबत 'काँटे की टक्कर'

Goa Assembly Election Result Updates : गोव्यात भाजपची आघाडी; काँग्रेससोबत 'काँटे की टक्कर'

Goa Assembly Election Result Live Updates :सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप एका जागेवर आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. सध्या भाजप ९ तर काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 मार्च : देशातल्या पाच राज्यांचं पुढील 5 वर्षांचं भवितव्य आज ठरणार आहे (Assembly Election Result 2022) . पैकी गोवा हे महाराष्ट्राच्या शेजारी असलेलं राज्य आहे. जिथे मतदानाच्या टक्केवारीनं यावेळी नवा उच्चांक गाठला. 79 टक्के मतदान झालेल्या या राज्यात त्रिशंकू विधानसभा असेल की पूर्ण बहुमत मिळेल? हे आज ठरणार आहे. गोव्यातील 40 विधानसभेच्या जागांसाठी 301 उमेदवार निवडणूक लढले. यापैकी कुणाला जनता निवडून देणार हे काही तासातच स्पष्ट होईल. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून नॉर्थ गोव्यात बेलेट पोस्टलमध्ये भाजप पुढे असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या भाजप ९ तर काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे Uttar Pradesh Election Results 2022: उत्तर प्रदेशमधून पहिला कल हाती,भाजप आघाडीवर काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार असल्याची तयारी दाखवली आहे. भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या सगळ्या उमेदवाराना 4 वाजता पार्टी ऑफिसमध्ये यायला सांगितलं आहे. तर दुसरीकडे  महाराष्ट्र  आणि कर्नाटक काँग्रेसचे नेते गोव्यात तळ ठोकून बसले आहेत. काँग्रेसने आपल्या बाजूने तयारी केली असली तरी भाजपने 13 आमदारांच्या बळावर सरकार स्थापन केलेलंही या राज्याने पाहिलं आहे. त्यामुळे काय होऊ शकतं? याचा अंदाज काही तासांत येईल.

Election Results:उत्तराखंडमधून पहिला कल हाती,देवभूमीमध्ये भाजपला10 जागांवर आघाडी

40 जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी यावेळी जोर लावल्यामुळे सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या; मात्र तरीही सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या