JOIN US
मराठी बातम्या / देश / धारदार शस्त्रांसह दोन गट भिडले, हत्येचा LIVE VIDEO आला समोर

धारदार शस्त्रांसह दोन गट भिडले, हत्येचा LIVE VIDEO आला समोर

लॉकडाऊन सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गिर सोमनाथ, 16 मे : देशावर कोरोनासारखं गंभीर संकट आलं असतानाही वाद, खून, मारामारी यांसारखे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशातच गुजरातमधील गिर सोमनाथ इथं एक खळबळजनक घटना घडली आहे. एकाच समुहातील दोन गटात तुफान राडा झाला आहे. हे दोन्ही गट धारदार शस्त्र आणि लाठ्याकाठ्यांसह आमने-सामने आले होते. त्यानंतर झालेल्या हल्ल्यात 1 जणाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. लॉकडाऊन सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दोन गट समोरासमोर आल्यानंतर झालेल्या या वादाचा गर्दीतीलच एका व्यक्तीने व्हिडिओ काढला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या