JOIN US
मराठी बातम्या / देश / माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटर सपोर्टवर; कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर झाली सर्जरी

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटर सपोर्टवर; कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर झाली सर्जरी

प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची ब्रेन सर्जरी यशस्वी झाली आहे. न्यूज एजंसी पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यांना आर्मी रिसर्च आणि रेफरल रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. यापूर्वी प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली होती. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याच आवाहन केलं होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतरही अनेक केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांनी मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. मेंदूत गाठ झाल्याने त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या