JOIN US
मराठी बातम्या / देश / आणखी एक नेता हरपला; पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन

आणखी एक नेता हरपला; पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन

माजी आमदार जरनेल सिंह यांचं निधन (AAP Ex-MLA Jarnail Singh Dies) झालं आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे. कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 मे: दिल्लीमध्ये (Delhi) आम आदमी पार्टीचे नेते (AAP) आणि राजौरी गार्डनचे माजी आमदार जरनेल सिंह यांचं निधन (AAP Ex-MLA Jarnail Singh Dies) झालं आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे. कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना चप्पल फेकून मारल्यानं जरनेल सिंह चर्चेत आले होते. यानंतरच त्यांनी आम आदमी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि त्यांनी विजयही मिळवला. याआधी जरनेल सिंह यांनी 1984 मधील दंग्यांचा विरोध करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कोरोना एक प्राणी, त्यालाही जगण्याचा अधिकार; माजी मुख्यमंत्र्यांचं अजब विधान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जरनेल सिंह यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं, की दिल्लीचे माजी आमदार जरनेल सिंह यांच्या निधनामुळे अतिशय दुःख झालं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते नेहमीच लक्षात राहातील. देशात कोरोनाची दुसरी लाट येतीये आटोक्यात! रुग्णसंख्येत घट तर रिकव्हरी रेट वाढला केजरीवाल सरकारमधील मंत्री मनीष सिसोदिया यांनीही जनरेल सिंह यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, की दिल्ली विधानसभेतील माजी साथीदार जनरेल सिंह यांच्या निधनाची बातमी आपल्या सर्वांसाठी दुःखद आहे. 1984 मध्ये नरसंहारच्या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा एक बुलंद आवाज आपल्यातून निघून गेला आहे. देव त्यांना आपल्या चरणात जागा देवो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या