JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO: पाकची खोड त्यांनाच नडली, पाहा भारतीय सैन्याने कसा उद्ध्वस्त केला शस्त्रांचा डेपो आणि लॉन्चिंग पॅड

VIDEO: पाकची खोड त्यांनाच नडली, पाहा भारतीय सैन्याने कसा उद्ध्वस्त केला शस्त्रांचा डेपो आणि लॉन्चिंग पॅड

सैन्याकडून मिळालेल्या हवाई फुटेजवरून असे दिसून येते की पाकिस्तानचा शस्त्रसाठा असलेला डेपो पूर्णपणे नष्ट झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 एप्रिल : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा इथल्या केरन आणि मच्छल सेक्टरमध्ये पाक सैन्याने सकाळी 11 वाजल्यापासून गोळीबार सुरू केला. जेव्हा पाकिस्तानने प्रथम लहान शस्त्रे आणि तोफांचा वापर केला तेव्हा सैन्याने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. नंतर घाबरून पाकिस्तानने नागरिकांना लक्ष्य करुन तोफातून गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सैन्याने आपल्या 105 मिमी फील्ड गन आणि बोफोर्स तोफाच्या सहाय्याने अचूक गोळीबार केला, पाक आर्मी शस्त्रे आगार तसेच दहशतवाद्यांचे प्रक्षेपण पॅड पूर्णपणे नष्ट केले. हे पाकिस्तानच्या अश्वकामच्या दक्षिणेपासून नीलम खोऱ्यापर्यंतचे क्षेत्र आहे. विशेष बाब म्हणजे बहुतेक सैन्य पाकिस्तानी बाजूने सीमेवरुन गोळीबार करीत होते, भारतीय सैनिकांनी त्यांच्या चौक्यांना लक्ष्य करुन गोळीबार केला. पण त्यानंतर पाकिस्तानने सैन्याच्या चौक्यांऐवजी नागरिकांना लक्ष्य केले.

सैन्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याच्या कारवाईत पाक सैन्य आणि दहशतवाद्यांचे बरेच नुकसान झाले आहे. भारतीय सैन्याने त्यांचे अनेक बंकर नष्ट केले आहेत. सध्या पाक सैन्यातील किती जवान आणि किती दहशतवादी ठार झाले याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु सैन्याकडून मिळालेल्या हवाई फुटेजवरून असे दिसून येते की पाकिस्तानचा शस्त्रसाठा असलेला डेपो पूर्णपणे नष्ट झाला आहे.

एनडी टीव्ही दिलेल्या वृत्तामध्ये पाक सैन्याच्या या कारवाईमुळे नियंत्रण रेषेकडे राहणाऱ्या लोकांच्या निवासस्थानांचे नुकसान झाले आहे. परंतु सैन्याला काहीच नुकसान झालेले नाही. तथापि, भारतीय सीमेच्या बचावासाठी तैनात असलेल्या सैन्याने पाकिस्तानच्या या खोटेपणाला चोख प्रत्युत्तर दिले. परिणामी पाकिस्तानने अडीच नंतर गोळीबार थांबविला. केरन सेक्टरमध्ये 5 एप्रिल रोजी सैन्याने 5 घुसखोरांना ठार केले होते आणि आपले पाच सैनिक शहीद झाले होते. संकलन, संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या