JOIN US
मराठी बातम्या / देश / व्यावसायिकाच्या बँक लॉकरमध्ये आढळलं 1000 वर्षे जुनं शिवलिंग; किंमत जाणून व्हाल अवाक

व्यावसायिकाच्या बँक लॉकरमध्ये आढळलं 1000 वर्षे जुनं शिवलिंग; किंमत जाणून व्हाल अवाक

तंजावूरमधील एका ज्येष्ठ व्यावसायिकाच्या बँक लॉकरमध्ये (Shivling Worth Rupees 500 Crore Found in Bank Locker) एक अशी वस्तू आढळली ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई 03 जानेवारी : अनेकदा आपल्या असलेल्या पुरातन वस्तू दिसताना अतिशय सामान्य वाटतात. मात्र, याचं महत्त्व आणि त्यामुळे त्याला असलेली किंमत याची कल्पनाही आपल्याला नसते.. एखाद्या व्यक्तीच्या घरात आढळलेल्या प्राचीन वस्तूला कोट्यवधी रुपये किंमत मिळाल्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर ऐकल्या असतील. सध्या अशीच एक घटना तमिळनाडूच्या तंजावूरमधूनही समोर आली आहे.

शिक्षकांचा अनोखा निरोप समारंभ, हत्तीवरून काढली वरात; जमली हजारोंची गर्दी

तंजावूरमधील एका ज्येष्ठ व्यावसायिकाच्या बँक लॉकरमध्ये (Shivling Worth Rupees 500 Crore Found in Bank Locker) एक अशी वस्तू आढळली ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या व्यावसायिकाच्या बँक लॉकरमध्ये एक प्राचीन शिवलिंग मिळालं. पाचूपासून बनलेलं हे शिवलिंग 530 ग्रॅमचं आहे. सर्वात विशेष आणि लक्ष वेधणारी बाब म्हणजे या 530 ग्रॅमच्या प्राचीन शिवलिंगाची किंमत 500 कोटी रुपये इतकी आहे. बँकेच्या लॉकरमध्ये आढळलेल्या या शिवलिंगाची लांबी 8 सेंमी आहे. हे शिवलिंग या ज्येष्ठ व्यावसायिकाकडे कसं आलं, याबद्दल सध्या काहीही माहिती समोर आलेली नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे. WION च्या रिपोर्टनुसार, एडीजीपी जयंत मुरली यांनी सांगितलं की त्यांना अशी माहिती मिळाली होती की तंजावूरमधील एका घरात अॅन्टिक मूर्ती ठेवलेली आहे. याच कारणामुळे याचा शोध घेण्यात आला असता हे शिवलिंग आढळून आलं. हे शिवलिंग नागपट्टिनमजवळील थिरुक्कुवलई येथील थ्यागराज स्वामी मंदिरातून 2016 साली चोरी झालं होतं.

चिमुकलीचा जबरदस्त क्लासिकल डान्स पाहून घालाल तोंडात बोटं; VIDEO एकदा बघाच

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साइन्टिफीक इन्वेस्टिगेशनद्वारे हे समजू शकलं नाही की हे शिवलिंग कधी बनवलं गेलं आहे. मात्र हे एक हजार वर्षापूर्वीच असल्याचं मानलं जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी केस दाखल करत तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या