JOIN US
मराठी बातम्या / देश / मंत्रिमंडळाचा मुहूर्त ठरला! 100 कोटींमध्ये राज्यसभा सीट? शिंदेंचा काँग्रेसला धक्का! TOP बातम्या

मंत्रिमंडळाचा मुहूर्त ठरला! 100 कोटींमध्ये राज्यसभा सीट? शिंदेंचा काँग्रेसला धक्का! TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 30 जूनला घेतली, त्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण, आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 100 कोटी रुपयांमध्ये राज्यसभा सीट देण्याचं आश्वासन देणाऱ्या चौघांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन भाजप नेतेच गायब झाल्याचे पाहायला मिळत आहेत. DHFL प्रकरणात (DHFL money laundering case)  पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा. 100 कोटींमध्ये राज्यसभा सीट, राज्यपाल करण्याचा वादा, चौघांना अटक 100 कोटी रुपयांमध्ये राज्यसभा सीट (Rajya Sabha Seat) तसंच राज्यपाल (Governor) करण्याचं आश्वासन देणाऱ्या चौघांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. या आरोपींना महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 30 जूनला घेतली, त्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. फक्त दोनच मंत्री राज्याचा कारभार हाकत असल्यामुळे विरोधक सतत सरकारवर टीका करत आहेत. पण, आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेनंतर काँग्रेसलाही धक्का एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेनंतर (Shivsena) आता काँग्रेसलाही (Congress) धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा देत कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. सावंत यांनी मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. अरुण सावंत (Arun Sawant) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन भाजप नेतेच गायब भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी अनेक वेळा त्यांच्या समर्थकांकडून केली जाते. मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे गेल्यानंतर मंत्रिमंडळात तरी पंकजा मुंडेंना मोठं पद द्यावं अशी त्यांची मागणीआहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रभरातील संवादयात्रेनंतरही पक्षाची स्थिती चिघळली एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना वेगळं करीत शिंदे गटाची स्थापना केली. यानंतर गेल्या अनेक दिवसात शिवसेनेतील आमदार, खासदारांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले आहे. पक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात संवाद यात्राही काढली. मात्र, तरीही पक्षातील गळती सुरूच आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पुण्यात रिक्षाचा प्रवास महागला! पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरांनी सामांन्यांचे बजेट बिघडले आहे. यातच आता आणखी एक झटका सहन करावा लागणार आहे. सध्या तरी ही बातमी पुणेकरांसाठी आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे आता रिक्षा भाडेवाड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. रणजितसिंह डिसले गुरुजींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा ‘डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार डिसले गुरुजी यांना जाहीर करण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अविनाश भोसलेंविरोधात CBI ची मोठी कारवाई DHFL प्रकरणात (DHFL money laundering case)  पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे.  मागील महिन्यातच अविनाश भोसलेयांना ईडीने अटक केली होती. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या