JOIN US
मराठी बातम्या / देश / दिल्लीमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले 11 मृतदेह, सगळ्यांच्या डोळ्याला बांधली होती पट्टी

दिल्लीमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले 11 मृतदेह, सगळ्यांच्या डोळ्याला बांधली होती पट्टी

दिल्लीत एकाच घरात 11 मृतदेह सापडले आहेत. यात 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 01 जुलै : दिल्लीच्या बुरोंडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत एकाच घरात 11 मृतदेह सापडले आहेत. यात 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. सगळ्यात गंभीर म्हणजे या सर्व मृतांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. बुरीडीच्या संत नगर गल्ली नंबर 2 मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. या मृत कुटुंबाचं किराना आणि प्लायचं दुकान असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

गौरी लंकेश प्रकरण : 50 मारेकऱ्यांच्या निशाण्यावर राज्यातील 26 व्यक्ती !

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या कुटुंबाने आत्महत्या केली आहे. पदरी पडलेलं दारिद्र्य असह्य झाल्याने या 11 जणांनी आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा अमानवी पद्धतीने या 11 जणांनी आत्महत्या केली त्यांची हत्या करण्यात आली याचा पोलीस तपास घेत आहे. अद्याप या प्रकरणात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण असे एकाच घरात 11 मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. या सगळ्या मृतदेहांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती आणि ते लटकवलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे पोलीस एका वेगळ्या दिशेने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा…

पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने 50 लाखांना लुटले!

VIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण

धर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या