नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात अनेकांनी आपले आपले नातेवाईक गमावले. नवविवाहित…कार्पेंटर…डीजे…व्यावसायिक…कामगार…यांसारख्या अनेकांचा दिल्लीतील हिंसाचारात दुर्देवी मृत्यू झाला. अनेकांनी आपल्या डोळ्यासमोर जीवलगांचा मृत्यू पाहिला. या दंगलीत 85 वर्षीय एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. दिल्लीत राहणाऱ्या मोहम्मद समानीचे गार्मेंट वर्कशॉप होतो. घराच्या पहिल्या माळ्यावर तो ते वर्कशॉप चालवत होता. त्याने सांगितले, मंगळवारी दूध आणण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला. मात्र जेव्हा तो घराच्या दिशेने यायला लागला तेव्हा त्याच्या गल्लीसमोर 100 ते 150 लोकांचा जमाव उभा होता. ते घराचा गेट तोडून आत शिरले. त्यांनी घराला व पहिल्या माळ्याला आग लागली. यातून माझी पत्नी व मुलगी सुखरुप बाहेर पडू शकल्या. मात्र माझी आई वृद्ध असल्याने तिला हालचाल करणे अवघड होते. अशा परिस्थितीत ती घराबाहेर पडू शकली नाही आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, असं 85 वर्षीय अकबारी यांचा मुंलगा मोहम्मद सलमानी यांनी सांगितले. वडिल आपल्या मुलीला चॉकटेल घेण्यासाठी बाजारात गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाला. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातून मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. दिपक कुमार (34), इशक खान (24), मोहम्मद मुदासीर (30), वीर भान (50), मोहम्मद मुबारक हुसेन (28), शान मोहम्मह (35), परवेश (48), झाकीर (24), मेहताब (22), अश्फाक (22), राहूल सोलंकी (26), शाहिद (25), मोहम्मद फुरकन (30), राहूल ठाकूर (23), रतन लाल (42), अंकित शर्मा (26), दिलबर, मोहसीन अली (24) आणि विनोद कुमार (50) यांचा मृत्यू झाला आहे. लोक नायक रुग्णालयातून दोन मृतांची नावे जाहीर करण्यात आली आहे. महरुफ अली (30), अमन (17) ही त्यांची नावे आहे. अशफाक हुसैन (22) हा मुस्ताफाबाद येथे राहणारा. मंगळवारी तो कामावरुन घरी जाण्यासाठी निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मानेवर दोनदा वार करण्यात आले होते. त्याच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. एका इलेक्ट्रिशनचादेखील त्याच रात्री मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह जीटीबी रुग्णालयात नेण्यात आला. त्यांची पत्नी तसनीम सांगत होती, फेब्रुवारी 14 तारखेचा त्यांचा निगाह झाला. त्याला ऑफिसवरुन घरी लवकर यायचे होते, मात्र दंगलीमुळे त्याला शक्य होत नसल्याचे अशफाकच्या काकीने सांगितले. आतापर्यंत या दंगलीत 30 जणांचा मृत्यू झाला असून 330 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.