JOIN US
मराठी बातम्या / देश / COVID सेंटरमध्येच आरोपीने केली दारु पार्टी, पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

COVID सेंटरमध्येच आरोपीने केली दारु पार्टी, पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

हा आरोपी पार्टी करत असतांना पोलीस कुठे होते असा प्रश्न आता विचारला जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची 23 ऑगस्ट: कोविड रुग्णांवर उपचारासाठी सर्व देशभर सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. त्या सेंटर्समध्ये राहण्याबाबत सरकारने काही नियम तयार केले आहेत. मात्र एका घटनेने झारखंड सरकार आणि पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. आरोपी दारु पार्टी करत असतांनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. धनबादमधल्या कोविड सेंटरमधली ही घटना आहे. या आरोपीच्या हातात बेड्या आहेत. मात्र तो राजरोसपणे दारु पितांना दिसत आहे. हा आरोपी पार्टी करत असतांना पोलीस कुठे होते असा प्रश्न आता विचारला जात आहे. तर राज्य सरकारने एक चौकशी समिती तयार केली असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, WHO च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनीही प्रौढांसारखे मास्क घालावे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत. WHOने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोनाचा धोका जास्त असतो. जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे. WHOने मुलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचेही सांगितले होते. WHOच्या मते, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. तर, 5 वर्षाखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या