JOIN US
मराठी बातम्या / देश / #BREAKING Coronavirus ने घेतला केंद्रीय मंत्र्याचा बळी; सुरेश अंगडी यांचं निधन

#BREAKING Coronavirus ने घेतला केंद्रीय मंत्र्याचा बळी; सुरेश अंगडी यांचं निधन

सुरेश अंगडी यांना दोन आठवड्यापूर्वी COVID-19 चं निदान झालं होतं. ते 65 वर्षांचे होते. दिल्लीतल्या AIIMS रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं Covid-19 मुळे निधन झालं. पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री Coronavirus ला बळी पडले आहेत. अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी Tweet करून आपल्याला Corona चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.Covid चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 11 सप्टेंबरला Tweet करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांनी कळवलं होतं. डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. सुरेश अंगडी 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. Covid चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 11 सप्टेंबरला Tweet करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांनी कळवलं होतं. डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. ते 65 वर्षांचे होते. सुरेश अंगडी यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत. सुरेश अंगडी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते विलक्षण कार्यकर्ते होते, असं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी केलेल्या Tweet मध्ये लिहिलं आहे की, “सुरेश अंगडी यांनी कर्नाटकात भाजपला बळकट करण्यासाठी खूप प्रयत्न केले. ते झोकून देऊन काम करणारे खासदार आणि मंत्री होते.”

संबंधित बातम्या

सुरेश अंगडी 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांना प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या