रुग्ण संख्या वाढत असतांनाच शिमल्याच्या IGMC हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर जनक यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
मुंबई, 07 ऑगस्ट : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात जुलै अखेरपासून कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 9 दिवसांत जवळपास 50 हजारहून अधिक रोज नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद केली जात आहे. आज मात्र गेल्या अनेक दिवसांमधील सर्वात धक्कादायक आणि रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली आहे. देशभरात 24 तासात 62 हजार 538 नवीन कोरोनाग्रतांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंतचा आकडा 20 लाख 27 हजार 074 वर पोहोचला आहे. बुधवारी 56 हजार 282 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर कोरोनामुळे 24 तासांत 904 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
हे वाचा- ‘कोरोनाचा 20 लाख आकडा पार, गायब आहे मोदी सरकार’, राहुल गांधींची जहरी टीका आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाग्रस्त 6 लाख 07 हजार 384 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात 41 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असला तरीही त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत 13 लाख 78 हजार 105 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशातला रिकव्हरी रेट 67.62% वर पोहोचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील वाढणारी आकडेवारी कमी होण्याचं नाव घेत नाहीय.