JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनामुळे या राज्यात 'टोटल लॉकडाऊन', इतिहासात पहिल्यांदाच सर्व शहरांना लागलं टाळं

कोरोनामुळे या राज्यात 'टोटल लॉकडाऊन', इतिहासात पहिल्यांदाच सर्व शहरांना लागलं टाळं

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण राजस्थान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजस्थान, 22 मार्च : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि त्याचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी भारताने तयारी सुरू केली आहे. यासाठी सर्व राज्यांमधील शाळा, कॉलेज, ऑफिसं बंद करण्यात आली आहेत. मात्र कोणत्याही शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले नव्हते. आता राजस्थान संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारं पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण राजस्थान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. कोरोना व्हायरस थांबविण्याचा राजस्थान सरकारचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 31 मार्चपर्यंत संपूर्ण राज्य बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सर्व बाजारपेठा, आस्थापने व शासकीय कार्यालये बंद राहतील. रोडवेसह सर्व सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांच्या वाहतुकीवरही बंदी घातली आहे. या काळात काही महसूल संबंधित बाबींमध्ये काम केले जाऊ शकते. वाचा- सगळ्यात मोठी बातमी, मुंबई-पुण्यावरून जाणाऱ्या 3000 प्रवाशांची ट्रेन रोखली त्यामुळे राजस्थानमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्य 31 मार्चपर्यंत बंद राहील. याबाबत राजस्थानच्या गृह विभागाने सविस्तर आदेशही जारी केले आहेत. वाचा- कोरोनाचं नवं केंद्र आहे ‘हे’ शहर, दर 3 मिनिटाला होतोय एकाचा मृत्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर गहलोत सरकारने राजस्थान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी गुरुवारी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना रविवारी, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. वाचा- पोलीस बंदोबस्त तैनात,पाहा कुठे आहे प्रशासनाचा आदेश डावलणाऱ्यांवर ‘ड्रोन’ची नजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी म्हणजेच आज सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला आहे. पीएम मोदी यांनी सर्व देशवासीयांना घर सोडू नये, असे आवाहन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या