नवी दिल्ली, 01 मे : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वेगानं वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 33 हजारहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 1075 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पासून व्हायरवर मात करून आतापर्यंत 8372 रुग्ण बरे झाले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे संक्रमितांच्या आकडेवारीत राज्यानं 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. 3 मे रोजी हा दुसरा टप्पा संपणार आहे. काही राज्यांनी त्यांच्या पातळीवर लॉकडाऊन आणखीन दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणखीन वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता प्रश्न हा उपस्थित होतो की भारताला या दोन टप्प्यातील लॉकडाऊनमुळे फायदा झाला का?
चेन्नईतील मॅथेमॅटिकल सायन्सच्या डेटा सायंटिस्ट सीताभ्रा सिन्हा यांनी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनमुळे देशाला मोठा फायदा झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. तीन दिवसांमध्ये दुप्पट वेगानं वाढणाऱ्या कोरोनाचा वेग आता 11 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे निश्चित फायदा होत आहे असं म्हणावं लागले. हे वाचा- लॉकडाऊन हटवा नाहीतर…, या देशात बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले नागरिक देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दर 15 दिवसांनंतर दुप्पट वाढ होत आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी अवघ्या 4.4 दिवसात दुप्पट होत होती. तर 27 एप्रिल पर्यंत ही वेग 10.77 दिवस होती. दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि ओडिशामध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे 11-15 दिवसांत रुग्णांची गती दुप्पट होत आहे. तेलंगणामध्ये रुग्णांच्या दुप्पट होण्याचे प्रमाण 58 दिवसात सर्वात कमी आहे. त्यानंतर केरळ उत्तराखंड हरियाणाचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र आणि गुजरातमधील परिस्थिती सर्वात वाईट आहे. या दोन राज्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील ताज्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या 10 हजारच्या वर गेली आहे. तर गुजरातमध्ये 4082 रुग्ण आहेत. देशातील या दोन राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 432 लोकांचा मृत्यू झाला. तर गुजरातमधील मृतांची संख्या 197वर पोहोचली आहे. हे वाचा- देशाची रक्षा करणाऱ्या कोरोना योद्धांवर मोठं संकट, 40 पोलिसांची चाचणी पॉझिटिव्ह संपादन- क्रांती कानेटकर