तर सध्या एकूण 17 हजार 862 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता 18 हजारापेक्षाही कमी झाली आहे.
नवी दिल्ली, 14 मे : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच या व्हायरसचा प्रादुर्भाव रोवाखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. मात्र सर्वात गंभीर स्थिती ओढावली आहे ती पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घरापासून दूर मजुरासाठी गेलेल्या कामगारांवर. ऊन, वारा, पाऊस याचा मुकाबला करत हे मजूर हजारो किलोमीटरचं अंतर कापत घराकडे निघाले आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागातून आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात 12 राज्यांच्या ग्रामीण भागातील 5 हजारांहून अधिक कुटुंबाचे सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणातून जी माहिती समोर आली आहे, ती सरकारची झोप उडवणारी आहे. कारण ग्रामीण भागातील 50 टक्के कुटुंब अर्धपोटी राहात असल्याचे धक्कादायक चित्र या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. कोरोनाशी ग्रामीण भागाचा लढा या सर्वेक्षणातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 12 राज्यांच्या 47 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. लॉकडाऊनमुळे 50 टक्के कुटुंबांना आपले रोजचे जेवणच कमी करावे लागले. 68 टक्के कुटुंबांना आपल्या जेवणातील पदार्थ कमी करावे लागले आहेत. ज्या कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे युरोपमधील अनेक बलाढ्य देश हैराण झाले आहेत, त्याच कोरोना व्हायरसने भारतातील गरीब वर्गालाही दु:खाच्या खाईत लोटलं आहे. त्यामुळे या रोगावर लवकरात लवकर नियंत्रण न मिळवल्यास देशातील परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते. दरम्यान, करोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडकडून 3100 कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांसाठी 1 हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे. संपादन - अक्षय शितोळे