मुंबई, 30 जून : देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा वेग कमी होत असल्याचं मागच्या 24 तासात दिसून आलं आहे. त्यामुळे थोडी चिंता कमी झाली आहे. नुकत्याच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 24 तासांत 18 हजार 522 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 66 हजार 840 वर पोहोचला असून त्यापैकी 2,15,12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3 लाख 34 हजार 822 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे मागच्या 24 तासांत 418 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा 16 हजार 893 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारातून रुग्ण बरे होण्याचा आतापर्यंतचा दर 59.6% झाला आहे. त्यामुळे ही थोडी दिलासा देणारी बाब आहे.
हे वाचा- कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. सोमवारी 5257 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा 1,69,883 झाला आहे. तर सोमवारी 181 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 7610 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 73298 एवढे Active रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत सोमवारी 71 जणांचा मृत्यू झाला तर 1226 नवे रुग्ण सापडले. सलग चौथ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. संपादन- क्रांती कानेटकर