JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : दुकानं उघडताच तळीरामानं असं काही केलं की ते पाहून तुम्हीही म्हणाल बस्स एवढचं बाकी होतं

VIDEO : दुकानं उघडताच तळीरामानं असं काही केलं की ते पाहून तुम्हीही म्हणाल बस्स एवढचं बाकी होतं

दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या आहेत. दारूच्या दुकानाबाहेर होणारी गर्दी रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मे : कोरोना व्हायरसचं संसर्ग वेगानं वाढत आहे त्यामुळे 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दीड महिन्यांनंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारनं दारूची दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहे. सरकानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करत लोकांनी दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या आहेत. दारूच्या दुकानाबाहेर होणारी गर्दी रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 41 दिवसांनंतर म्हणजेच दीड महिन्यांनंतर आता दारूची दुकानं उघडल्यानंतर दुकानाबाहेर नारळ फोडून पूजा आणि आरती केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तळीरामानं दीड महिन्यानं दारूचं दुकानं उघडल्यानं पूजा आणि आरती केली आहे. अशा कॅप्शननं बालाजी नावाच्या युझरनं ट्वीटरवर हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. बेंगलुरुमधील दारू विक्री कऱणाऱ्या दुकानाबाहेरचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा- VIDEO:आम्हाला तुमचा अभिमान आहे!‘कोरोना योद्धा’ डॉक्टरचं घरी असं झालं स्वागत

या व्हिडीओला आतापर्यंत 13 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. 200 हून अधिक युझर्सनी लाईक तर 70 जणांनी रिट्वीट केलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिला टप्पा 14 एप्रिल दुसरा टप्पा 3 मेपर्यंत आणि तिसरा टप्पा 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दारूची दुकानं उघडण्यासंदर्भात गृहमंत्रालयानं काही गाइडलाइन जारी केल्या आहेत. या गाइडलाइनुसार कंटेनमेंट झोन म्हणजेच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत. रेड झोनमध्ये काही ठिकाणी तर ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारूची दुकाने उघडली जातील. पण या दुकानांमध्ये जाताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यावश्यक असल्याचं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मद्यपान करताना पान, गुटखा, तंबाखू इत्यादी सार्वजनिक ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचं अंतर बाळगणं आवश्यक आहे. दुकानात एकावेळी पाचपेक्षा जास्त लोक नसावेत. जाणून घ्या कोणत्या राज्यांमध्ये आजपासून उघडणार दारूची दुकानं. हे वाचा- इन्स्पेक्टर यांनी पार पाडलं बापाचं कर्तव्य तर पोलीस झाले वधू-वराचा परिवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या