अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली, 10 एप्रिल : देशभरातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 24 तासांत देशात 37 मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनावरील (Covid - 19) नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन (LOckdown) लागू करण्यात आलं आहे. अद्याप देशातील कोरोनाबाधिकांचा आकडा वाढत असताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत ओडिशा आणि पंजाब या दोन राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवून 30 एप्रिलपर्यंत केली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत देशात 37 जणांचा मृत्यू झाला असून 896 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6761 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 206 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 516 इतका आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. संबंधित - धक्कादायक! भारतात कोरोना पसरवण्याचा कट, देशात पाठवलेत 40-50 संशयित रुग्ण? ओडिशानंतर ‘या’ राज्याने 1 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे