JOIN US
मराठी बातम्या / देश / GOOD NEWS! रशियात कोरोनाची लस तयार; पुढील महिन्यापासून उत्पादन होणार सुरू

GOOD NEWS! रशियात कोरोनाची लस तयार; पुढील महिन्यापासून उत्पादन होणार सुरू

कोरोनाची लस सुरू होणार याकडे जगभरातील नागरिकांचे लक्ष आहे.

जाहिरात

कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी कंपनीकडून 100 एमजी वायल 1000 रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या रुग्णालयांना हे औषध कंपनीच्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मास्को, 4 ऑगस्ट : जगभरात कोरोना व्हायरसच्या लशीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. जगात पहिल्यांदा कोरोनाची लस तयार करण्याच्या स्पर्धेत रशियात खूप पुढे निघून गेली आहे. ताज्या रिपोर्टनुसार रशियात पुढील महिन्यापासून कोरोना लशीचं उत्पादन सुरू करणार आहे. रशियाच्या एका एजंन्सी टीएएसएसने सांगितले की सध्या देशाच्या गरज पूर्ण करण्यासाठी कोरोना व्हायरसची लस बनविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पहिल्या टप्प्यातील कोरोना लशीचं उत्पादन सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल. येथे तयार झाली कोरोना व्हायरसची लस रशियाचे संरक्षणमंत्री यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या लशीचा ट्रायल शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. या लशीला गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ ऐपीडेमीलॉजी अंड मायक्रोबायॉलॉडी तयार करीत आहे. या लशीचं ह्युमन ट्रायलमध्ये सहभागी घेणारे सर्वांमध्ये इम्युनिटी दिसत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडॅनॉम यांनी, अपेक्षा आहे की कोरोनाची लस (Covid-19 Vaccine) लवकरच मिळेल. मात्र सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे आणि ते मिळेल असेही दिसत नाही आहे, असे सांगितले. WHOने सोमवारी म्हटले आहे की, COVID-19 टाळण्यासाठी लस तयार करण्याची शर्यत तीव्र झाली असली तरीही कोरोनावर कोणताही ‘रामबाण उपाय’ कदाचित कधीच मिळू शकणार नाही. WHOने असेही म्हटले आहे की भारतासारख्या देशात ट्रान्समिशनचे दर खूप जास्त आहेत आणि त्यांनी दीर्घ युद्धासाठी सज्ज असले पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या