JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनाचा धोका वाढतोय! 24 तासांत 909 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, देशातील आकडा 8,356 वर

कोरोनाचा धोका वाढतोय! 24 तासांत 909 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण, देशातील आकडा 8,356 वर

कोरोनामुळे आतापर्यंत 273 जणांचा मृत्यू, 24 तासांत 909 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल: भारतात कोरोना व्हायरस एप्रिल महिन्यात वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7,367 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 716 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये सर्वात लहान 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या

शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 7 हजार 400च्या वर गेली होती. देशात 586 कोव्हिड हॉस्पिटल्स तयार झाले असून 1 लाख आयसोलेशन बेड्सही तयार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणखीन दोन आठवडे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या