(संग्रहित फोटो)
नवी दिल्ली, 6 एप्रिल : जगभरातील देशाला सध्या कोरोना या एका व्हायरसने हैराण करून टाकलं आहे. अनेक देशांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करून टाकला आहे, तर काही देश मदतीसाठी सैरभैर झाले आहेत. स्पेन, जर्मनी, इटली, अमेरिका, फ्रान्स अशा प्रगत देशांनाही या व्हायरसने सळो की पळो करून सोडलं आहे. मात्र अशातच एक दिलासादायक बातमीही आली आहे. जगभरातील अडीच लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आता पूर्णपणे बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. वेळेत आणि योग्य उपचार पद्धतींमुळे हे होऊ शकलं आहे. पण उपचारांसोबत या रुग्णांनी दाखवलेलं धैर्यही महत्त्वाचं आहे. कारण कोरोना या एका फक्त शब्दांने आता सर्वसामान्यांचा थरकाप उडत आहे. अशातच तो आजार झाल्यानंतर योग्य वेळी तपासणी करून घेणं आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तातडीने उपचार घेणं गरजेचं आहे. असं केल्यास या आजारालाही हरवता येऊ शकतं, हेच या आजारातून बरं होऊन बाहेर पडलेल्या लाखो लोकांनी दाखवून दिलं आहे. जगभरात काय आहे कोरोनाची स्थिती? - जगभरात 12 लाखाहून अधिकजणांना कोरोनाची लागण. - कोरोनाच्या संसर्गामुळे 69 हजारजणांचा मृत्यू. - जगभरात अडीच लाख रुग्णांनी दिली कोरोनाला मात. - अमेरिकेत 3 लाख 20 हजारांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा. - अमेरिकेत मृतांची संख्या वाढली, 9 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू. - स्पेनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 30 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त भारतातही कोरोनाचा चढता आलेख देशभरातील करोनाबाधितांची संख्या 4 हजार 67 वर पोहोचली असून 109 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 241 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायने दिली आहे. गेल्या 24 तासांत 693 नवे रुग्ण आढळले आहेत. भारतातील कोरोना व्हायरसच्या संक्रमनामुळे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयातील 63 टक्के लोकांचा समावेश आहे.