JOIN US
मराठी बातम्या / देश / White House ने पंतप्रधान मोदींना ट्विटरवर केलं Unfollow , राहूल गांधींनी दिली ही प्रतिक्रिया

White House ने पंतप्रधान मोदींना ट्विटरवर केलं Unfollow , राहूल गांधींनी दिली ही प्रतिक्रिया

‘White House ने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना Unfollow केल्याने मी निराश आहे. परराष्ट्रमंत्रालय याची योग्य दखल घेईल अशी मला आशा आहे.’

जाहिरात

New Delhi: Prime Minister Narendra Modi shakes hands with US President Donald Trump prior to their meeting at Hyderabad House, in New Delhi, Tuesday, Feb. 25, 2020. (PTI Photo/Kamal Singh)(PTI2_25_2020_000183B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 29 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. जगभरात त्यांना फॉलो केलं जातं. जगभरत ज्या मोजक्या लोकांना सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत त्यात मोदींचा वरचा क्रमांक लागतो. कोरोनावर प्रभावी ठरणारी Hydroxychloroquine ही ओषधी अमेरिकेला हवी होती. त्या काळात म्हणजे 19 दिवसांपू्र्वी White House ने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपतींचं ऑफिस, पंतप्रधान कार्यालय, अमेरिकेतलं भारताचं दुतावास आणि भारतातल्या अमेरिकेच्या राजदूतांना ट्विटरवर फॉलो करायला सुरूवात केली होती. जगातल्या नेत्यांपैकी White House हे फक्त मोदींनाच फॉलो करते अशी बातमी त्या काळात झाली होती. आता औषधी मिळताच White House ने या सगळ्यांनाच फॉलो करणं बंद केलं आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. White House ने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना Unfollow केल्याने मी निराश आहे. परराष्ट्रमंत्रालय याची योग्य दखल घेईल अशी मला आशा आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची वाढती आपत्ती लक्षात घेता सोमवारी एक मोठा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि एका अदृश्य शत्रूशी (कोरोनाव्हायरस) सामोरे जाण्यासाठी असा निर्णय घेतले असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी ट्वीट करत, मी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली ज्यानुसार इतर कोणत्याही देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. सीएनएनच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा या कार्यकारी आदेशावर सही केली आहे. त्यानुसार जोपर्यंत कोरोना संसर्गाची प्रकरणे पुढे येत राहतील, कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येण्यावर तात्पुरती बंदी असेल.  ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की कोरोना केवळ विमानतळांद्वारे म्हणजेच परदेशातून येणाऱ्या लोकांमुळे अमेरिकेत पसरल.  त्यामुळे देशाचे आरोग्य आणि अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी आता इतर कोणत्याही देशातील नागरिकांच्या देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या