JOIN US
मराठी बातम्या / देश / केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यानेच उलटवलं काँग्रेसचं सरकार, शिवराजसिंहांची Audio Clip व्हायरल 

केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यानेच उलटवलं काँग्रेसचं सरकार, शिवराजसिंहांची Audio Clip व्हायरल 

‘काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकार राज्याला मोठ्या संकटात टाकेल. त्यांच्यापासून राज्याला वाचवणं आवश्यक आहे असं केंद्रीय नेतृत्वाचं मत होतं.’

जाहिरात

Jaipur: BJP vice-president Shivraj Singh Chouhan Shivraj Singh Chauhan addresses a press conference at the BJP office in Jaipur, Monday, Aug 19, 2019. (PTI Photo) (PTI8_19_2019_000064B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 10 जून: मध्यप्रदेशात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत राज्यातलं काँग्रेसचं कमलनाथ सरकार उलथवून टाकलं होतं. त्यानंतर काँग्रेसला मोठा हादरा बसला होता. मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावर आता मोठा खुलासा झाला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यानेच सरकार उलटविण्यात आलं असं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं. त्यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मध्यप्रदेशातल्या सत्ता पालटाशी भाजपचा काहीही संबंध नाही असं अमित शहा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सांगत होते. मात्र सिंह यांच्या या ऑडिओ क्लिपने त्यांचा तो दावा खोटा ठरवला आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पाठिंबा दिल्यानेच हे ऑपरेशन यशस्वी ठरलं अशी माहिती आता पुढे आलीय. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकार राज्याला मोठ्या संकटात टाकेल. त्यांच्यापासून राज्याला वाचवणं आवश्यक आहे असं मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलं होतं. हे काम ज्योतिरादित्य शिंदे आणि तुलसी सिलावट यांच्या शिवाय झालंच नसतं. या दोघांनी धोका दिला असा काँग्रेसचा दावा आहे. मात्र धोका या नेत्यांनी नाही तर काँग्रेसनेच दिला अशी टीकाही शिवराजसिंह चौहान यांनी केली.

संबंधित बातम्या

या क्लिप नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपनेच सत्ता हडपण्यासाठी हे काम केलं असं आम्ही कायम सांगत आलो असा आरोप काँग्रेस कायम करत आली आहे. त्यालाच या आरोपांमुळे पुष्टी मिळते असं काँग्रेसने म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपची खातरजमा ‘न्यूज18 लोकमत’ने केलेली नाही. संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या