मुंबई, 08 जुलै: जगातील सर्वात सुंदर नातं कोणतं असा जर प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर प्रत्येकाच्या ओठावर आई-मुलाचं नातं असंच उत्तर येईल. आईचा मायेचा हात डोक्यावरून फिरल्यानंतर आपण जगातली सगळी दु:ख विसरून जातो. आईचं ममत्व आणि प्रेम आपल्याला प्रत्येक समस्या आणि संकटाशी लढण्याचं बळ देत असते. चिंपाजी चक्क बछड्याची आई झाल्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चिंपांजीनं बछड्याला दूध पाजलं आहे. निरागस जीवाला आईचं प्रेम दिलं आहे. हा व्हिडीओमधील चिंपाजीचं बछड्याप्रती प्रेम पाहून अनेक युझर्सचे डोळे पाणावले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये श्वान एका मांजरीच्या पिल्लाची आई झाली किंवा माकडाच्या पिल्लाची आई श्वास झाली. किंवा माकडीणीनं एका मांजरीच्या पिल्ला दूध पाजलं असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले पण एक हटके आणि दुर्मीळ व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.