JOIN US
मराठी बातम्या / देश / BREAKING NEWS: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले, थोड्याच वेळात मोदींची घेणार भेट

BREAKING NEWS: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले, थोड्याच वेळात मोदींची घेणार भेट

मराठा आरक्षणाच्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 जून: कोरोना परिस्थितीवर उपाययोजना आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे  दिल्लीत दाखल झाले आहे. महाराष्ट्र सदनात शिष्टमंडळ पोहोचले असून थोड्याच वेळात पंतप्रधानांच्या भेटीला रवाना होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे आज सकाळीच मुंबईहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते. सकाळी 9 च्या सुमारास दिल्ली विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहे.  पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकाळी 11 वाजता भेट होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील राहणार उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.  या भेटीनंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना मिळणार मुंबईत हक्काचे घर, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा त्याचबरोबर,  महाराष्ट्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थिती, लसीकरण, GST परतावा या संदर्भात महत्वाची चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘ते’ पत्र चोरण्यासाठी अजितदादांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते? सेनेचा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी मदत मागितली होती. पण अजूनही केंद्राकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर हक्काचे असलेली जीएसटीचा परतावा सुद्धा केंद्र सरकारने दिलेला नाही, त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी याबद्दल मागणी केली होती. आता खुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या