JOIN US
मराठी बातम्या / देश / आपलं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं तो भाग नेमका आहे तरी कसा?

आपलं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं तो भाग नेमका आहे तरी कसा?

चंद्राच्या इथल्या पृष्ठभागावरच्या धुळीमध्ये विद्युतभार असलेले आणि रेडिएशन असलेले कण आहेत. लँडरच्या उपकरणांमध्ये इथली धूळ बसली तर यंत्र खराब होऊ शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 सप्टेंबर : चांद्रयान -2 मोहिमेतल्या विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला आणि अपेक्षित लँडिंग झालं नाही. त्यानंतर ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोंमधून लँडरचं लोकेशन कळलं. पण आता याबद्दल युरोपियन स्पेस एजन्सीच्या माहितीनुसार, विक्रम चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे तो धोकादायक भाग आहे. युरोपियन एजन्सीलाही तिथे लँडिंग करायचं होतं पण ती मोहीम सफल झाली नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुवावर इतका धोकादायक का? युरोपियन स्पेस एजन्सीने चांद्रयानासारखीच ल्युनार लँडर नावाने अर मोहीम हाती घेतली होती. त्यांचं हे यान 2018 मध्ये चंद्रावर उतरणार होतं. पण बजेट कमी पडल्यामुळे ही मोहीम मध्येच थांबवण्यात आली. त्यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात काय धोके आहेत याचा एक अहवाल युरोपियन स्पेस एजन्सीने केला होता.त्यानुसार चंद्राच्या या भागात गुंतागुंतीचं पर्यावरण आहे. रेडिएशनची धूळ इथल्या पृष्ठभागावरच्या धुळीमध्ये विद्युतभार असलेले आणि रेडिएशन असलेले कण आहेत. लँडरच्या उपकरणांमध्ये इथली धूळ बसली तर यंत्र खराब होऊ शकतात. आता कॅनडा आणि जपान या देशांनीही 2020 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची योजना बनवली आहे. ही मोहीमही रोबोवरच आधारित आहे. सुरक्षित लँडिंगसाठी या गोष्टी महत्त्वाच्या या रिपोर्टनुसार, चंद्रावरच्या कमी उताराच्या उंच डोंगरांच्या भागात लँडिंग करायला हवं. नाहीतर हे लँडर उतरण्याच्या वेळेला धोका होऊ निर्माण होऊ शकतो. विक्रम लँडर अशाच दुर्गम भागात अडकलं आहे. त्यातच त्याचा इस्रोशी संपर्क होण्याच्या शक्यता फारच कमी आहेत. अशा धोकादायक भागात यान उतरवून भारताने एक मोठी जोखमीची मोहीम पार पाडली आहे =============================================================================================== VIDEO : एकादशीला नासाने कसं सोडलं यान? ऐका भिडे गुरुजींचा तर्क

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या