JOIN US
मराठी बातम्या / देश / चंद्रयान 3 मोहिमेत होणार मोठे बदल, असा आहे नवीन प्लॅन

चंद्रयान 3 मोहिमेत होणार मोठे बदल, असा आहे नवीन प्लॅन

कोरोना विषाणूचा साथीचा आणि लॉकडाऊनचा परिणाम इस्रोच्या बर्‍याच प्रकल्पांवर झाला.

जाहिरात

त्यात पहिल्या योजनेनुसार डिसेंबर 2020मध्ये मानव नसलेलं (Unmanned mission) यान पाठवलं जाणार होतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : चंद्रयान-2 नंतर आता पुन्हा एकदा तिसऱ्या मोहिमेसाठी भारताची तयारी सुरू झाली आहे. भारताचा चंद्रयान -3 पुढच्या वर्षाच्या सुरवातीला लॉन्च होऊ शकेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी ही माहिती दिली. चंद्रयान 2 च्या तुलनेत चंद्रयान-3च्या मोहिमेसाठी काही बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी ऑर्टिंबर असणार नाही तर फक्त लँडर आणि रोव्हर असे दोन भाग असणार आहेत. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चंद्रयान-2 मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाल्यामुळे त्याच्यासोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर पुन्हा एकदा इस्रोने ही मोहीम हाती घेतली असून पुढच्या वर्षी चंद्रयान-3 पाठवणार असल्याची माहिती दिली आहे.

कोरोना विषाणूचा साथीचा आणि लॉकडाऊनचा परिणाम इस्रोच्या बर्‍याच प्रकल्पांवर झाला आणि चंद्रयान -3 सारख्या महत्त्वपूर्ण मोहिमांनाही त्यामुळे उशीर झाल्याची माहिती दिली. 2021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात केव्हाही ही मोहीम सुरू केली जाऊ शकते. चंद्रयान-2 प्रमाणेच सर्व गोष्टी आणि नियोजन असणार आहे फक्त त्यामध्ये एक बदल करण्यात आला आहे. हे वाचा- देशात कोरोनाचा विस्फोट, एकाच दिवसात सापडले तब्बल 90 हजारहून अधिक रुग्ण चंद्रयान-3 साठी ऑर्बिटर नसेल तर केवळ लँडर आणि रोव्हरचा समावेश असेल. चंद्रयान-2 मोहीमेत दक्षिण ध्रूवावर उतरणं नियोजित असतानाही विक्रम लँडरने 7 सप्टेंबरला हार्ड लँडिंग केल्यामुळे भारताला अपयश आलं. चंद्रयान-3 मोहिमेत काही बदल करण्यात आले आहेत. याचा परिणाम कसा दिसेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रयान-3 मोहिमेसाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या