JOIN US
मराठी बातम्या / देश / आणखी 15 दिवस वाढवला जाऊ शकतो Lockdown या क्षेत्रांना मिळू शकते सुट 

आणखी 15 दिवस वाढवला जाऊ शकतो Lockdown या क्षेत्रांना मिळू शकते सुट 

31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 28 मे: लॉकडाऊन 4.0 संपायला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. केंद्र आणि राज्य स्तरावर आता त्याचा आढावा घेतला जात आहे. 31 मे पर्यंतचा हा लॉकडाऊन संपल्यानंतर आणखी 15 दिवस वाढवला जाऊ शकतो Lockdown 5.0. हा लॉकडाऊन आणखी वेगळ्या स्वरुपाचा असू शकतो. त्यासंदर्भात केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी आज कोरोनाचा प्रकोप असलेल्या महत्त्वाच्या 13 शहरांच्या आयुक्तांशी चर्चा केली. या नव्या लॉकडाऊनमध्ये जीम आणि मंदिरांना सुट दिली जाऊ शकते. मात्र मॉल्स, शाळा, कॉलेजेस यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही असे संकेत केंद्राने दिली आहेत. गौबा यांनी मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता/हावड़ा, इंदौर, जयपुर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या शहरांच्या आयुक्तांशी चर्चा केली. प्रतिबंधित क्षेत्रात आणखी कडक उपाय योजना करा अशी सूचनाही राजीव गौबा यांनी केली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन चार संपण्यापूर्वी पुन्हा एकदा लॉकडाउन -5 लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. सूत्रांचे म्हणणे की मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आठवडे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. या लॉकडाऊनमध्ये सरकार जनजीवन आणि अर्थव्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमध्ये सूट देण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन 5 चे 11 शहरांमध्ये कडक निर्बंध असतील. ही अशी शहरे आहेत जिथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या