JOIN US
मराठी बातम्या / देश / CBSE Result : कमाल आहे! दिव्यांशीने 12 वीत प्रत्येक विषयात मिळवले 100 पैकी 100 मार्क

CBSE Result : कमाल आहे! दिव्यांशीने 12 वीत प्रत्येक विषयात मिळवले 100 पैकी 100 मार्क

दिव्यांशीने हा अभ्यास स्वत:हून केला आहे, विशेष म्हणजे यासाठी तिने शिकवणीही घेतली नव्हती

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जुलै : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बारावीच्या परीक्षेत लखनऊच्या दिव्यांशी जैनने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. सोमवारी बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये दिव्यांशी हिला 600 पैकी 600 मार्क मिळाले आहेत.  अर्थात तिला प्रत्येक विषयात पूर्ण मार्क मिळाले आहेत. दिव्यांशी जैन लखनऊच्या नवयुग रेडियन्स पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे. घर आणि शाळेत आनंदाचे वातावरण दिव्यांशी हिने इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, इन्शोरेन्स आणि अर्थशास्त्र विषयात 100 पैकी 100 मिळवले आहे. दिव्यांशीला हायस्कूलमध्येही 97.6 टक्के गुण मिळाले आहेत. दिव्यांशीच्या निकालानंतर तिच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. तर शाळेत शिक्षकांचे अभिनंदन करणार्‍यांसाठी मोठी वर्दळ आहे. दिव्यांशी तिच्या यशाबद्दल सांगते की, तिला 100 टक्के क्रमांक मिळण्याची अपेक्षा नव्हती. ती तिच्या परीक्षेच्या निकालामुळे खूप खूश आहे आणि पुढच्या प्रवासामध्ये तशाच प्रकारे काम करत राहील. दिव्यांशीला आता दिल्ली विद्यापीठातून बीए (ऑनर्स) शिकायचे आहे. खास गोष्ट म्हणजे दिव्यांशी हिने कोचिंगशिवाय हे यश मिळवले आहे. हे वाचा- वयाच्या 21 व्या वर्षी जज होऊन मयंकने रचला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात मिळालं यश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) 12 वीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यावेळी एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 88.78 टक्के आहे. यंदाच्या सीबीएसई इयत्ता 12 च्या परीक्षेत 92.15 टक्के विद्यार्थीनी आणि 86.19 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी 16043 परदेशी विद्यार्थ्यांनी भाग घेतला, त्यातील 15122 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल तपासू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या