नवी दिल्ली, 03 जुलै : दिल्लीतल्या बुराडी गुढ मृत्यू प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ‘देवाला भेटायला जायचं आहे’ अशी नोंद घटनेच्या चार दिवस आधीच डायरीत करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं हे मृत्यू अंधश्रद्धेचाच प्रकार असल्याचा दावा आणखी बळकट होऊ लागला आहे. खरतर हे सगळं प्रकरण 11 या अंकाभोवती फिरत आहे. 11 पाईप, 11 खिडक्या, 11 दरवाजे, 11 लोखंडी ग्रिल आणि मृतांची संख्याही 11 आहे. घरात मिळालेल्या डायरीतून पोलिसांनी घरात 11 दरवाजे, 11 खिडक्या, 11 लोखंडी ग्रिल शोधून काढल्या आहेत. त्याचबरोबर घराच्या दरवाजात 11 रॉडही लावण्यात आले आहेत. हे सगळं तंत्र आणि मंत्र कोणत्या बाबाने दिलं याचा दिल्लीचे पोलिस सध्या कसून तपास करत आहेत. परिसरात राहणाऱ्यांच्या सांगण्यानुसार भाटिया कुटुंबियांनी रात्री 11:45ला दुकान बंद केलं होतं. त्यात समोरच्या सीटीव्हीमध्ये फुटेजनुसार 10:45 ला त्यांच्या घरी फुड डिलिव्हरी बॉय आला होता. पण त्या व्यक्तीचा फोटो सीसीटीव्हीमध्ये दिसत नसल्याने त्याचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत. हजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन ‘चंद्रशेखर सावंत’ दरम्यान, 2015 पासूनच्या नोंदी या डायरीत असून शेवटची नोंद ही 30 जूनची आहे. या डायरीत जे लिहिलं आहे ते वाचलं तर काळजाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. पोलीस तपासाअंतर्गत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या घरात एक रजिस्टर मिळालं. त्या रजिस्टरचं थेट कनेक्शन हे या 10 जणांच्या मृत्यूशी आहे. कारण मरण्याचा संपूर्ण प्लान या रजिस्टरमध्ये लिहला आहे. कोण कुठे आणि कसं मरणार याचा संपूर्ण विश्लेषण या रजिस्टरमध्ये लिहलं आहे. कोण कोणत्या जागेवर उभं राहून फाशी घेणार याचा सगळा तपशील यात लिहला आहे आणि यात लिहल्याप्रमाणेच या सगळ्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. हेही वाचा…