वांद्र्यात डबलडेकर बसला अपघात

वांद्र्यात डबलडेकर बसला अपघात

वांद्र्यात डबलडेकर बसला अपघात झालाय. कलिनाच्या दिशेने जात असलेल्या या बसला अपघात झालाय. बस ओव्हहेड रेलिंगला धडकलीय.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : वांद्र्यात डबलडेकर बसला अपघात झालाय. कलिनाच्या दिशेने जात असलेल्या  या बसला अपघात झालाय. बस ओव्हहेड रेलिंगला धडकलीय. पण सुदैवानं यात कुणी जखमी झालं नाही.

अंधेरीचा रेल्वे पूल कोसळल्यानं अगोदरच सगळ्यांनी रस्त्यावरून प्रवास करायचं ठरवलं. कारण रेल्वे सेवा कोलमडल्यामुळे जनतेकडे काहीही पर्याय नाही. शिवाय प्रचंड पाऊस, अनेक सखल भागात साचलेलं पाणी त्यामुळे रस्त्यावरून वाहनांना जाताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय. वाहतुकीची कोंडीही झालीय.

 अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. ऑफिसला जाण्याच्या वेळेत पश्चिम रेल्वे खोळंबल्याने अनेक चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सुदैवाने त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांनी रस्ते मार्गाने ऑफीस गाठण्याचा प्रयत्न केला. यात पावसाची भर पडल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली आहे.

तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही हे हेल्पलाईन नंबर वापरू शकता

अंधेरी - 022676 30054

चर्चगेट - 02267622540 02222082809

बोरिवली - 02267634053 02228051580

मुंबई सेंट्रल - 02267644257

सुरत - 02602401791

First published: July 3, 2018, 1:02 PM IST

ताज्या बातम्या